Pernem Dainik Gomantak
गोवा

Pernem News : पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण

Pernem News : अजूनही हे काम पूर्ण झाले नसून डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे आपण संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे केदार नाईक यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News :

पेडणे, पत्रादेवी येथील प्रसिद्ध हुतात्मा स्मारकाचे बांधकाम डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा साळगावचे आमदार केदार नाईक यांनी दिली.

हे काम लांबणीवर पडल्याची पूर्ण कल्पना असून अजूनही या कामासाठी सुमारे चार कोटी रुपये मिळणार असून आत्तापर्यंत झालेला व मिळणारे चार कोटी मिळून १४ कोटी रुपये खर्च या कामासाठी होणार असल्याची माहिती केदार नाईक यांनी दिली. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासोबत पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी तोर्सेचे उपसरपंच रमेश बुटे, पंच प्रार्थना मोटे, छाया शेट्ये, विजय तोरस्कर, पूजा साटेलकर, तांबोसे - मोपा - उगवेचे सरपंच सुबोध महाले गोवा साधन सुविधांचे व्यवस्थापक विश्वनाथन कुसट, सहाय्यक व्यवस्थापक महादेव नाईक, सल्लागार संदीप पेडणेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ व सूर्यकांत तोरसकर उपस्थित होते.

केदार नाईक पुढे म्हणाले, की पत्रादेवी येथील या स्मारकाकडे आल्यानंतर भावनिक संबंध जोडले जातात. गोवा मुक्तीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचे प्रतीक या ठिकाणी असून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन ज्यांनी गोवा मुक्त व्हावा यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या थोर वीरांचे प्रतीक हे स्मारक असल्याने ते चांगल्यापद्धतीने व्हावे यासाठी सरकार आणि गोवा साधनसुविधा विकास महामंडळ प्रयत्नशील आहे.

डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी हे काम लांबवल्याने या कामाची पाहणी करण्यासाठी आपल्याला निमंत्रित केले. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण दिल्लीला गेलो आणि जरा व्यस्त राहिलो. मात्र, आता अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे. अजूनही हे काम पूर्ण झाले नसून डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे आपण संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे केदार नाईक यांनी सांगितले.

भव्य दिव्य होणार स्मारक ः आर्लेकर

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, की पत्रादेवी येथील हे भव्य स्मारक गोव्यातील एक चांगले पवित्र ठिकाण म्हणून या ठिकाणी राज्यातील तसेच देशाच्या विविध भागातील लोक येणार आहेत. गोव्याच्या इतिहासाच्या लढ्याची या स्मारकामुळे शालेय विद्यार्थी तसेच युवा पिढीला माहिती मिळणार आहे. संपूर्ण गोव्यात भव्य दिव्य असे हे स्मारक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

Bel Tree: कूर्मपुराणात लक्ष्मीचे निवासस्थान मानला गेलेला, शिवाच्या तांडवाला शांत करणारा 'बेलवृक्ष'

SCROLL FOR NEXT