Pernem News Dainik Gomantak
गोवा

Pernem News : कुठल्याही क्षेत्रात सहकार्य ठरते महत्त्वपूर्ण : प्रसाद लोलयेकर

पेडणेत कौशल्य मूल्यमापन प्रयोगशाळेचे उद्‌घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem : विविध व्यवसायांमध्ये भविष्य घडविण्यासाठी महाविद्यालयांना मदत करण्यासाठी गोव्यात उभारण्यात येणारी दुसरी युवा कौशल्य मूल्यमापन प्रयोगशाळा शिक्षकांच्या सहकार्याने योग्य ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. कुठल्याही क्षेत्रात सहकार्य हे महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी येथे केले.

शासकीय महाविद्यालयात आयोजित युवा कौशल्य मूल्यमापन प्रयोगशाळेचे उद्‌घाटन केल्यानंतर ते प्रामुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुत्झमेस्टर काँक्रिट मशीन्स प्रा.लि. वेर्णाचे प्रा. (डॉ.) कंजनाभा भट्टाचार्य, जीडीपी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त किशोर शाह व संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय पेडणेचे प्राचार्य (डॉ.) फिलिप रॉड्रिग्ज ई मेलो हे उपस्थित होते.

पुत्झमेस्टर कांजनभा भट्टाचार्य म्हणाले की,प्रत्येक इच्छुकाने तंत्रज्ञानाची जाण, गोष्टी पूर्ण करण्याची क्षमता आणि संवाद या तीन गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. मूल्यमापन प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करेल.

मूल्यमापन प्रयोगशाळेसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्याद्वारे संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास मदत होईल.

किशोर शाह, जीडीपी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT