Pernem Muncipal Council Dainik Gomantak
गोवा

Pernem: 3 दिवसात पगार देणार, नगराध्यक्षांचे आश्वासन; पेडणे पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

तीन महिन्यांपासून पगार न दिल्याने पेडणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची घोषणा केली.

Pramod Yadav

Pernem Muncipal Council: तीन महिन्यांपासून पगार न दिल्याने पेडणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या समोरच आंदोलन सुरु केले.

येत्या तीन दिवसांत दोन महिन्यांचा पगार देतो असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या काळासाठी संप मागे घेण्यात आला आहे.

Pernem Muncipal Council

पेडणे पालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा पगार मिळाला नसल्यामुळे मंगळवारी सकाळी कामगार संपावर गेले. गोमंतक मजूर संघ मार्फत पालिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले.

गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांनी पेडणे पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. 'पगार देणे जमत नसेल तर पालिका बरखास्त करून तिचे पंचायतीत रूपांतर करावे.' अशी प्रतिक्रिया कलंगुटकर यांनी दिली.

दरम्यान, पेडणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 3 दिवसात दोन महिन्याचा पगार देणार असल्याची ग्वाही पेडणे पालिका नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे तात्पुरते धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT