Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

Goa Acid Attack Case: ऋषभ आणि मृत मुलीमध्ये पूर्वी जवळीक होती. या प्रकरणात शारीरिक संबंधाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला.
Student Acid Attack Dhargal
Student Acid Attack DhargalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Acid Attack Case: धारगळ येथे कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या 17 वर्षीय ऋषभ उमेश शेट्ये या तरुणावर सोमवारी सकाळी अ‍ॅसिड फेकण्याची खळबळजनक घटना घडली. या धक्कादायक घटनेत तो 90 टक्के भाजला. त्याच्यावर सध्या गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने संपूर्ण पेडणे तालुक्यात खळबळ उडाली. आरोपी नीलेश गजानन देसाई (वय 42, रा. कळणे – दोडामार्ग, सध्या राहणार धारगळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचदरम्यान, आता मृत मुलीच्या आईने खळबळजनक आरोप केला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नीलेशच्या मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्या घटनेला कारणीभूत ऋषभ असल्याचा समज नीलेश याचा झाला. त्यामुळे सूडभावनेने पेटून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

Student Acid Attack Dhargal
Acid Attack Goa: 'न्यायव्यवस्था न्याय देऊच शकत नाही, आपल्यालाच करावं लागेल' चित्रपटांनी रुजवलेली मानसिकता धारगळ ॲसिड हल्ल्याला जबाबदार?

मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरवून सूड?

दुसरीकडे, नीलेश याच्या मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता होती. ऋषभ आणि मृत मुलीमध्ये पूर्वी जवळीक होती. या प्रकरणात शारीरिक संबंधाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आता मुलीच्या आईने ऋषभच्या आईवर केला आहे. सततच्या या धमकीमुळेच मुलीने आत्महत्या केली, असा ठपका तिने ठेवला.

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ऋषभविरुद्ध तात्काळ POSCO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी दोडामार्ग पोलिस स्थानकात पुराव्यानिशी निवेदनही देण्यात आले.

दरम्यान, अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या नीलेश देसाई याच्या कुटुंबीयांनी आता ऋषभच्या विरोधात तक्रार देण्याची तयारी दर्शवली आहे. ते व्हॉट्सअ‍ॅप चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे पोलिसांना देणार असून मृत मुलगी आणि ऋषभ यांच्यातील संवाद दाखवणाऱ्या पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाईची मागणी केली जाईल, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.

Student Acid Attack Dhargal
Acid Attack Goa: धक्कादायक! धारगळ येथे 16 वर्षीय विद्यार्थ्यावर फेकले अ‍ॅसिड; कॉलेजला जात असता अज्ञातांनी केला हल्ला

पोलिसांचा तपास सुरु

सध्या दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दोडामार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत. अ‍ॅसिड हल्ला हा गंभीर गुन्हा असून यामागील सर्व पार्श्वभूमी आणि कारणांची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणाने सोशल मीडियावरही प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. युवक आणि युवती यांच्यातील नातेसंबंध, त्यातून झालेला वाद, आत्महत्या आणि त्यानंतरचा सूडभाव या सर्व गोष्टी कोकणासारख्या शांत परिसरातही धक्कादायक घडामोडी घडू शकतात, याच वास्तव दाखवून देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com