Pernem Municipality Dainik Gomantak
गोवा

Pernem Municipality: पेडणे नगराध्यक्षांची ग्वाही कामगारांकडून आंदोलन स्थगित

तीन दिवसांत पगार देणार

दैनिक गोमन्तक

Pernem Municipality: पेडणे पालिकेच्या हंगामी दहा ते बारा कामगार व चार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना मागच्या दोन आणि चार महिन्यांचा पगार मिळाला नसल्याच्या निषेधार्थ पेडणे पालिकेच्या कर्मचारी, कामगारांनी मंगळवार, 3 रोजी पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.

गोमंतक मजूर संघामार्फत या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली होती. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष पुती गावकर यांनी मुख्याधिकारी अनंत मळीक, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांच्याकडे चर्चा केली. त्यावेळी नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी तीन दिवसांच्या आत या कामगार, कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाईल.

शिवाय ‘पीएफ’विषयी आपण मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल व त्यांच्या फंडाचा जो निधी आहे. तो निधीही यापूर्वीच एका एजन्सीकडे सुपुर्द केला असून त्या एजन्सीने ‘पीएफ’मध्ये तो निधी गुंतवला नसल्याचे सिद्धेश पेडणेकर यांनी सांगून आपणही यात लक्ष घालणार असे आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी हे आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे गावकर यांनी सांगितले.

या आंदोलन करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला. पालिकेचे कर्मचारी ३६५ दिवस परिसराची स्वच्छता करतात आणि त्यांना हक्काचा पगार मिळत नाही. सरकारने त्यांच्या पगाराची लवकरात लवकर तरतूद करावी. जर सरकारला जमत नसेल तर पेडणे पालिका बरखास्त करून तिचे पंचायतीमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी यावेळी दीपक कलंगुटकर यांनी केली.

कामगारांचा पगार त्यांना वेळेवर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मात्र, निधीची कमतरता असल्यामुळे थोडा उशीर होत आहे. परंतु जो अडलेला पगार आहे. तो आम्ही तीन दिवसांच्या आत देणार आहोत.
- सिद्धेश पेडणेकर, नगराध्यक्ष, पेडणे पालिका
कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नावर योग्य ते उत्तर मिळवण्यासाठी मुख्याधिकारी तथा पेडणे मामलेदार आनंद मळीक यांच्याशी चर्चा केलेली आहे. पगार वेळेवर द्यावा. जर पगार वेळेवर दिला नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आज आंदोलन स्थगित ठेवण्यात येत आहे. परंतु याहीपुढे पगाराचा प्रश्न आला तर कामगार रस्त्यावर यायला मागे-पुढे पाहणार नाहीत.
- पुती गावकर, अध्यक्ष, गोमंतक मजूर संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT