Carlos Álvares Ferreira Dainik Gomantak
गोवा

Pernem Excise Office: सरकारी खात्यात 27 लाखांचा अपहार! मुख्य कारकूनावर गुन्हा का नोंद केला नाही? आमदार फेरेरांचा सवाल

Pernem excise office controversy: बनावट पावतीद्वारे परवाना नूतनीकरण प्रकरणात, पेडणे अबकारी कार्यालयात नियुक्त असताना, मुख्य कारकून हरीश नाईक यांना सरकारकडून सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

Sameer Panditrao

म्हापसा: बनावट पावतीद्वारे परवाना नूतनीकरण प्रकरणात, पेडणे अबकारी कार्यालयात नियुक्त असताना, मुख्य कारकून हरीश नाईक यांना सरकारकडून सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, या बडतर्फ आदेशात आवश्यक कायदेशीर गोष्टींचा व मुद्द्यांचा उल्लेख केलेला नाही.

परिणामी न्यायालयात या आदेशाला आव्हान देता येऊ शकते. त्यामुळे हरीश नाईक यांच्यावरील एकंदरीत बडतर्फची कारवाई ही फार्स वाटते, असे हळदोणेचे काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अबकारी शुल्क विभागाने २७.७८ लाख रुपयांच्या परवाना नूतनीकरण शुल्काचा गैरवापर झाल्याप्रकरणात हरीश नाईक यांच्यावर कारवाई केली होती. या घोटाळा प्रकरणात, सरकारने हरीश नाईक यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, मुळात गुन्हा दाखल करून हरीश नाईक यांना अटक करायला हवी होती.

परंतु, सरकारला भीती वाटते, की संबंधित दोषी अधिकारी या भ्रष्टाचाराची साखळी उघड करेल का? असे काही प्रश्न विचारत, याप्रकरणी अ‍ॅड. फेरेरा यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर रविवारी (ता.२८) व्हिडिओ पोस्ट करुन सरकारला खडेबोल सुनावलेत.

आमदार कार्लुस फेरेरांचे प्रश्‍न

१ मुळात बडतर्फ कारवाईच्या एक पानी आदेशात मुख्य मुद्देच गहाळ आहेत. हरीश नाईक यांच्यावर आरोप निश्चित करणे गरजेचे होते. तसेच तपास अधिकाऱ्यांनी कोणते निष्कर्ष काढून, आपला कोणता निर्णय दिला आहे. याबद्दल सविस्तर मुद्दे आदेशात येणे अनिवार्य होते. परंतु, या गोष्टी बडतर्फ आदेशात गहाळ आहेत.

२ त्यामुळे बडतर्फ आदेशात त्रुटी असल्याने याला न्यायालयात आव्हान दिले जावू शकते, असे झाल्यास सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, असेही फेरेरा म्हणाले. कारण नैतिकता व कायदेशीरपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, यावर फेरेरा यांनी जोर दिला. त्याचप्रमाणे सरकारची बडतर्फचा आदेश हा पूर्णतः फार्स असल्याचे फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Slum: झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देऊ देत, पण नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार काय़?

Goa Postcards: मलय वृक्षपरी, गवा रेडा, उडता सोनसर्प! ‘पोस्ट कार्ड’ वर झळकतेय गोव्याची जैवविविधता

Canacona: शेतात कचरा पेट्या, गटाराची दुर्गंधी; काणकोणात महिला आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

Colvale Accident: एकामागोमाग 4 गाड्या धडकल्या! बाईकस्वाराला वाचवताना उडाला गोंधळ, खराब रस्त्यांमुळे मधोमध घसरला

Mobor: 'रात्रीचे 1.30 वाजलेले, समुद्रात बोट बुडत होती आणि... ', पेलेने सांगितली 27 मच्छीमारांना वाचवण्याची थरारक गोष्ट

SCROLL FOR NEXT