Colvale Accident: एकामागोमाग 4 गाड्या धडकल्या! बाईकस्वाराला वाचवताना उडाला गोंधळ, खराब रस्त्यांमुळे मधोमध घसरला

Goa road accident Colvale: म्हापसा-पेडणे महामार्गावरील महाखाजन येथे एका विचित्र अपघातामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे
multiple vehicle crash
multiple vehicle crashDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यातील रस्त्यांची दुरवस्था चर्चेचा विषय बनली आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी अपघात घडत असून, अनेकांचा जीव धोक्यात येत आहे. अशाच एका दुर्दैवी घटनेत, सोमवारी (दि. २९) म्हापसा-पेडणे महामार्गावरील महाखाजन येथे एका विचित्र अपघातामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

एकामागे एक चार गाड्यांची धडक

कोलवाळमधील महाखाजन परिसरात रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे एका बाईकस्वाराचा अपघात झाला. बाईक घसरून तो खाली पडल्याने जखमी झाला. त्याला वाचवण्यासाठी मागून येणाऱ्या वाहनांनी अचानक ब्रेक लावले, त्यामुळे एकामागे एक चार वाहनांची विचित्र धडक झाली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

multiple vehicle crash
Old Goa Accident: 3 वर्षांपूर्वी झाला होता अपघात, पादचारी झाला ठार; सबळ पुराव्याअभावी बसचालकाची निर्दोष मुक्तता

जखमी रुग्णालयात, पोलिसांचा पंचनामा सुरू

अपघातात जखमी झालेल्या बाईकस्वाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com