Mobor: 'रात्रीचे 1.30 वाजलेले, समुद्रात बोट बुडत होती आणि... ', पेलेने सांगितली 27 मच्छीमारांना वाचवण्याची थरारक गोष्ट

Pele Fernandes: पेले फर्नांडिस हा केवळ एक मच्छीमार नसून तो मच्छीमारांचा देवदूत आहे. त्याने आपले साहस पणाला लावून मोबोर येथील समुद्रात बुडत असलेल्या २७ मच्छीमारांचा प्राण वाचविले.
Pele Fernandes rescues fishermen
Pele Fernandes rescues fishermenDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: पेले फर्नांडिस हा केवळ एक मच्छीमार नसून तो मच्छीमारांचा देवदूत आहे. त्याने आपले साहस पणाला लावून मोबोर येथील समुद्रात बुडत असलेल्या २७ मच्छीमारांचा प्राण वाचविले. एका मुलाखतीत त्याने या मच्छीमारांना कसे वाचविले हे सविस्तर सांगितले.

त्याच प्रमाणे त्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लवकरात लवकर गोव्यातील मच्छीमारांना आपतकालीन स्थितीत वाचविण्यासाठी कमीत कमी चार बचाव बोटी आणण्याची विनंती केली.पेले यांनी पुढे सांगितले की, जर गोवा सरकारकडे होत नसेल तर त्यांनी आपला हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावा व केंद्र सरकार कडून या बचाव बोटीसाठी अनुदान मंजूर करुन घ्यावे.

गेल्या दोन वर्षांपासून आपण व इतर मच्छीमार सरकारकडे बचाव बोटींची मागणी करीत आहोत असे त्यांनी सांगितले. ही बोट सकाळी ९ वाजता बंद पडली व नंतर ती बुडू लागली होती. आपल्याला रात्री १.३० वाजता फोन आला. प्रथम अशा अपरात्री हा फोन कोणाचा हे आपल्याला कळले नाही. म्हणून आपण तो घेतला नाही. नंतर दोनच मिनिटांनी वार्का येथील आपल्या शेजाऱ्याचा फोन आला व त्याने सांगितले की, त्याच्या मित्राची बोट बुडत आहे व त्यात २७ मच्छीमार आहेत.

आपण आपली झेनस्की त्या बोटीच्या अगदी जवळ नेली व त्या मच्छीमारांना खाली उडी मारायला सांगितले. त्यांच्या सोबत ६५ वर्षा पेक्षा वयाने जास्त असा इसम होता जो आगोंदा भागीतील होता व त्याला कोकणी कळत होती, त्याने आपला आवाज ऐकला व त्याने आपल्या झेनस्कीत उडी मारली. आपण त्याच्या शर्टला धरुन त्याला आत घेतले. हे सांगताना त्याला गहिवरून आले होते.

‘पेले इज द किंग ऑफ सी...’

आपल्याला आपला पती पेलेचा अभिमान वाटतो असे त्याच्या पत्नीने सांगितले. प्रथम तो तिथे जायला मागे पुढे होत होता. पण नंतर आपणच त्याला धीर दिला असे ती म्हणाली. कारण ‘पेले इज द किंग ऑफ सी, ही नोज इन अण्ड आऊट ऑफ सी’ असे त्या म्हणाल्या. शिवाय देव त्याच्या पाठीशी आहे.

तो गेला खरा, पण आतून आपण पुष्कळ घाबरली होती. काय करावे सुचत नव्हते. एखाद्या सैनिकाची बायको जेव्हा तिचा पती लढाईला जातो तेव्हा तिची मानसिकता काय होत असेल तसा अनुभव आपल्याला आला, असे तिने सांगितले. पेले घरी आल्यावर त्याच्या दोन मुलांनी त्याचे स्वागत केले. त्यांनी त्याच्यासाठी लहानसा फलक तयार करुन लिहिले होते, ‘वाव, आय लव्ह यू पापा!’

Pele Fernandes rescues fishermen
मोबोर किनाऱ्यावर टळली मोठी दुर्घटना! मासेमारी जहाजाचा अपघात; साधनांचा अभाव तरीही वाचले 27 जणांचे प्राण

नेमके काय घडले?

  सेंट डेरील हा ट्रॉलर मासेमारीसाठी समुद्रात गेला होता. वादळी वारा आणि पावसामुळे ट्रॉलर हेलकावे खाऊ लागला आणि त्यात पाणी शिरले.

  याची माहिती मिळल्यानंतर पेले यांनी जीवरक्षक आणि पोलिसांच्या मदतीने खलाशांना वाचविले.

  पेले म्हणाले, की यंदा कॅप्टन ऑफ पोर्ट, मत्स्य खाते, पर्यटन विभाग यांनी वॉटर स्पोर्टसचे परवाने लवकर दिले.

  त्यामुळे ‘जेट स्की’ देखभालीची कामे लवकर झाली.

Pele Fernandes rescues fishermen
Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एक ट्रॉलरमध्‍ये पाणी शिरून आतमध्ये अडकलेल्या २७ खलाशांना जीवरक्षकांनी सुखरूप वाचवले. त्यांना वाचविण्यात ‘जेट स्की’चा मोठा वाटा होता, अशी माहिती मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी दिली.

मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी ‘जेट स्की’च्या मदतीने जीवरक्षक आणि बेतूल किनारी पोलिसांच्या मदतीने समुद्रात जाऊन त्या खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com