Primary Health Centre (PHC) in Casarvanem Dainik Gomantak
गोवा

Casarvanem: आवश्यक साधनसुविधांचा अभाव, तिन्ही रुग्णवाहिका नादुरुस्त; कासारवर्णे येथील आरोग्य केंद्राची दुरावस्था

Primary Health Centre Kasarvane: पेडणे तालुक्यातील पूर्वा कासारवर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडले आहे. सरकारने वेळीच लक्ष घालून सुधारणा घडवून न आणल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेली दक्षता समितीच अस्तित्वात नाही. त्यामुळे दुर्लक्ष झालेल्या पेडणे तालुक्यातील पूर्वा कासारवर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडले आहे. सरकारने वेळीच लक्ष घालून सुधारणा घडवून न आणल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

काँग्रेसचे पेडण्यातील नेते तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर, पेडणे काँग्रेसचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक, मोपा टॅक्सी असोसिएशनचे भास्कर नारुलकर, मोपा पीडित जन संघटनेचे निमंत्रक उदय महाले आदींनी बुधवारी दुपारी पूर्वा कासारवर्णे येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यापूर्वी कासारवर्णे येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी देवानंद नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांनी माहिती जाणून घेतली.

कासारवर्णे आरोग्य केंद्रावर कासारवर्णे, चांदेल, हसापूर, खुटवळ, हळर्ण, तळर्ण, इब्रामपूर, हणखणे, हेदूस, हाळी फकीरपाटो, पत्रादेवी, सक्राळ, लंगरबाग, कडशी मोप, मोपा, तांबोसे, उगवे, वारखंड, नागझर, भेंडाळे, दाडाचीवाडी, वझरी, सांगववाडा, तर्मास, तुळस्करवाडी, शमेचे आडवण, नाण्याचे पाणी आणि मोपा विमानतळ परीसरातील जनता अवलंबून आहे. मात्र या आरोग्य केंद्राकडे आवश्यक साधनसुविधा उपलब्ध नसल्याने या आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडले आहे.

तिन्ही रुग्णवाहिका नादुरुस्त

या आरोग्य केंद्रात तीन रुग्णवाहिका असून तिन्ही नादुरुस्त आहेत. दोन रुग्णवाहिकांची कागदपत्रे पूर्ण नाहीत. एका रुग्णवाहिकेची लाईट पेटत नसल्याने ती बंदच आहे. त्यामुळे बहुतेक वेळा १०८ रुग्णवाहिकेवरच अवलंबून राहावे लागते. यात सुधारणा न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचा खालचा पत्रा खराब झाल्याने मोडकळीस आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना रुग्णासोबत जाणाऱ्या एका नातेवाईकाचा पाय त्या पत्र्यात घुसल्याने त्या नातेवाईकालाच उपचारासाठी दाखल करून घ्यावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT