Perform fire audit of government buildings in Margao  Dainik Gomantak
गोवा

‘मडगाव मधील सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करा’

2019 मध्ये पालिकेने इमारतीचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव नगरपालिका इमारतीसह शहरातील सर्व सरकारी इमारतींना फायर ऑडिटची सक्ती करावी, अशी मागणी शॅडो कौन्सिलने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी एका पत्रकातून ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा मुद्दा मागे म्हणजे 2018 मध्ये त्यांनी उपस्थित केला होता.

मडगावातीत (Margao) प्रत्येक सरकारी कार्यालय इमारतीची अवस्था पाहिल्यास असे ऑडिट आवश्यक असल्याचे दिसून येते. कारण तेथे आगीचा भडका उडाला तर मालमत्तेचे नुकसान तर होईलच शिवाय महत्त्‍वाचे दस्तावेजही नष्ट होतील. कारण अशा इमारतींत अग्निशमन व्यवस्था नाही. मडगाव नगरपालिका (Municipality) इमारतीत तर ही व्यवस्था प्राधान्यक्रमाने हवी आहे. ही पालिका आपल्या कक्षेतील सर्व आस्थापनांसाठी अग्निशमन दाखल्याचा आग्रह धरते. पण तिच्या स्‍वत:च्‍या इमारतीतच ही व्यवस्था नाही. त्यामुळे हिच सर्वांत असुरक्षित इमारत आहे. यापूर्वी 2019 मध्ये पालिकेने इमारतीचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्‍यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यासंदर्भात पावले उचलावीत असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT