Peoples money squandered for swearing in ceremony in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शपथविधी सोहळ्यासाठी जनतेच्या पैशांचा चुराडा!

5.59 कोटी खर्चाची ‘कॅग’कडे तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याच्या शपथविधी सोहळ्यावर झालेल्या अनाठायी 5.59 कोटींच्या खर्चाची महालेखापालांमार्फत (कॅग) चौकशी करण्याची मागणी ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केली आहे. सोहळ्यासाठी करदात्यांच्या पैशांचा चुराडा करण्यात आला असून त्यातून जनतेला काहीच लाभ झालेला नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीनुसार, या शपथविधी सोहळ्याच्या स्टेडियमची भाडेपट्टी, प्रसिद्धी तसेच पोलिसांसाठी वापरलेल्या वाहनांच्या खर्चाचा समावेश केलेला नाही. हे कंत्राट एकाच एजन्सीला देण्याचे आधी ठरवले होते. मात्र, शपथविधी सोहळ्याला काही दिवस बाकी असताना कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया करून हे काम वेळेत पूर्ण होणार नाही, असे कारण फाईलवर नोंदविले होते. या कामाचे कंत्राट त्या एकाच एजन्सीला देण्याच्या हालचाली झाल्या. एकाच दिवशी सर्व खात्यांमधून ती फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली.

सरकारी तिजोरीत खडखडाट असताना या सोहळ्यावर अवाढव्य खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. या प्रकरणाची ‘कॅग’ने चौकशी करण्याची मागणी रॉड्रिग्स यांनी केली आहे.

18 मिनिटे: 5.59 कोटी

शपथविधी सोहळ्यासाठी सरकारने खर्च केलेला पैसा हा करदात्यांचा म्हणजेच जनतेचा आहे. अवघ्या 18 मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यावर तब्बल 5.59 कोटी रुपये खर्च करणे म्हणजे ही सरकारी तिजोरीची निव्वळ उधळपट्टी आहे. सरकारच्या समाजकल्याणकारी योजनांखालील लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांचे अर्थसाहाय्य देणे सरकारला शक्य झालेले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीजांनी गोव्‍यात व्‍यसनं आणली, गोवेकरांनी आध्‍यात्‍मिक वारसा जपला; आता देवपूजेबरोबर जास्‍त मानवसेवा करण्‍याची गरज..

एकाच महिन्यात 200 अपघात आणि 18 बळी, नितीन गडकरींचे CM सावंतांना पत्र; वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी!

Bodgeshwar Jatra 2026: श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाची तारीख जाहीर, म्हापशात कार्यक्रमांची रेलचेल; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Vasco: वास्कोत ‘सीसीटीव्ही’ बनले शोभेची वस्तू! गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नादुरुस्त कॅमेरे चर्चेत; कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित

Goa Live News: जागृत पर्यावरण प्रेमींसोबत; आमदार आरोलकर यांनी दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT