Calangute News: बार्देशातील किनारी भागात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन तसेच म्हापसा पोलिस उप-अधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सध्या धडक मोहीम राबविली आहे.
गेले दोन दिवस कळंगुट, वागातोर तसेच हणजूण भागात चाललेल्या या कारवाईत आतापर्यंत सुमारे १०० चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती निरीक्षक देसाई यांनी दिली.
किनारी भागात बेधुंदपणे वाहने चालवून स्थानिक लोकांच्या जीवितास धोका ठरलेल्या तसेच अनेकांचे प्राण घेतल्याच्या अनेक घटना गेल्या अनेक दिवसांत बार्देशातील कळंगुट तसेच हणजुण-वागातोर भागात घडलेल्या होत्या.
नुकतेच नागवा-हडफडे येथे आपल्या मुलांना जवळच्या हायस्कूलमध्ये पोहोचविण्यासाठी जात असलेल्या दुचाकी चालकाला गुजरात येथील पर्यटकाने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्थानिक रहिवाशी जॉन डिसौझा यांचा हकनाक बळी गेला होता. मृत जॉनची दोन्ही मुलेही जबर जखमी झाली होती.
दरम्यान, रात्रभर पार्ट्या झोडून दुसऱ्या दिवशी हॉटेलवर परतणाऱ्या अनेक पर्यटकांची वाहने रस्त्यालगत अपघातग्रस्त झालेल्या स्थितीत दिसून येतात.यापैकी बहुतांश अपघातांची नोंदच होत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.