Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

रवी नाईक यांच्याकडून फोंड्यातील जनतेला वाढत्या अपेक्षा

विकासाला गती; जुन्यांसह नवे प्रकल्पही कार्यान्वित होण्याची आशा

दैनिक गोमन्तक

फोंडा : नव्या फोंड्याचे ‘शिल्पकार’ तथा विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांच्याकडून येथील लोकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. फोंड्यात जो काही विकास झालेला आहे तो, रवी नाईक यांच्याच कारकीर्दीत झाला आहे, हे स्पष्टपणे दिसू लागल्याची भावना आहे.

मात्र 2012 साली रवी नाईक यांचा पराभव झाल्यानंतर या विकासाला दृष्ट लागली. 2012 ते 2017 पर्यंत आमदार असलेल्या लवू मामलेदार भाजप मगोयुतीचे सरकार असूनही फोंड्याचा विकास करू शकले नाहीत. त्यानंतर 2017 साली रवी नाईक परत निवडून आले असले तरी ते कॉंग्रेसचे आमदार असल्यामुळे त्यांना पाच वर्षे विरोधातच बसावे लागले. त्यामुळे फोंड्याचा विकासच थांबला. पण आता रवी हे भाजप (BJP) सरकारमध्ये कृषीमंत्री असल्यामुळे पुन्हा फोंडा शहराचा विकास वेगाने होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फोंड्यात (Ponda) सध्या अनेक समस्या भेडसावत असून त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे उपजिल्हा इस्पितळात नसलेली सिटी स्कॅनची सुविधा, उपजिल्हा इस्पितळ हे ही रवींनीच कार्यान्वित केले होते. आयडी इस्पितळाचा दर्जा वाढवून त्याचे आधुनिकीकरण करण्यात रवींचा सिंहाचा वाटा होता. पण गेली दहा वर्षे झाली अजूनही हे इस्पितळ आधुनिक आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे ह्रदय विकार, कर्करोग सारख्या दुर्धर रूग्णांना ‘गोमेकॉ’त (GMC) जावे लागते. भूमीगत वीजवाहिन्या घालून फोंड्यातील विजेच्या समस्येला रामराम करण्याचा मनोदय रवींनी आधीच व्यक्त केला आहे. मलनिस्सारण प्रकल्प तसेच भूमिगत गॅसवाहिनी प्रकल्प रखडला आहे. हे काम रवी पूर्णत्वास नेतील,असेही लोकांना वाटते आहे.

रवी नाईक यांनी मुख्यमंत्री (CM) असताना फोंड्याबरोबर मडकई मतदारसंघाचा कायापालट केला होता. मडकई आणि कुंडईतील औद्योगिक प्रकल्प असो किंवा मडकईतील विविध भागात पसरलेले कम्युनिटी हॉल असो तिथे ही रवींचीच छाप दिसते आहे. फोंड्याला तिसऱ्या जिल्ह्याचा दर्जा देणे. रवी नाईक (Ravi Naik) मंत्री झाल्यामुळे आता काही दिवसातच फोंड्याला तिसऱ्या जिल्ह्याचा दर्जा मिळेल व त्यामुळे फोंड्यातील तसेच नजीकच्या तीन तालुक्यातील लोकांना आपल्या कामाकरिता मडगावला जाण्याची वेळ येणार नाही, अशी आशा जनतेला दिसू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

Goa Live News: गोव्यात बरसणार मुसळधार सरी, हवामान विभागाकडून इशारा जारी

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

BJP Workers Fight: चहा-नाश्त्यावरून वाद, भाजप कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Watch Video

SCROLL FOR NEXT