CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Government Jobs : गोमंतकीयांनी सरकारी नोकरीचा विचार करणं सोडून द्यावं

गोवा सरकार राज्यात प्रदूषणविरहित प्रकल्प आणि नोकरीच्या संधी आणण्याच्या प्रयत्नात आहेत, असंही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : गोव्यातील लोकं केवळ सरकारी नोकरीचा विचार करतात. मात्र आता लोकांनी एलडीसी जॉबचा विचार करणं सोडून द्यावं. लोकांनी आता चांगल्या खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी शोधाव्यात असं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. गोवा सरकार राज्यात प्रदूषणविरहित प्रकल्प आणि नोकरीच्या संधी आणण्याच्या प्रयत्नात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आयटी क्षेत्रातील कंपन्याही गोव्यात कशा आणता येतील याचाही सरकार विचार करत आहेत. यातून गोव्यात मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गोमंतकीय तरुणांनी या खासगी क्षेत्रातील संधी आजमावण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सरकारी नोकरीच्या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं समुपदेशन करावं. पालकांपेक्षा शिक्षकांच्या समुपदेशनाचा विद्यार्थ्यांच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांनीही या समुपदेशनासाठी पुढाकार घ्यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान कालच मुख्यमंत्र्यांनी सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी 6 महिन्यात करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी सांगे आयआयटीला विरोध करणाऱ्यांचाही पुरता समाचार घेतला. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विविध व्यवसायांना चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

येत्या सहा महिन्याच्या आत आयआयटीचीही पायाभरणी केली जाणार असल्याची घोषणा डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या प्रस्तावित आयआयटी तसेच गोव्यात येणाऱ्या इतर प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकल्पासोबत रोजगाराच्या विविध संधी गोमंतकीयांसाठी उपलब्ध होणार असून केवळ सरकारी नोकरीच्या मागे न धावता गोमंतकीयांनी खासगी क्षेत्रातील संधी शोधण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT