Kadamba Employees Strike DainikGomantak
गोवा

Mhaji Bus Goa: ...तरच आम्ही ‘म्हजी बस’ योजनेविषयी विचार करू! इंधनावरील थकीत रक्कम द्या; बसमालक संघटनेच्या बैठकीत निर्णय

Goa Mhaji Bus Scheme: राज्यात एकूण १३०० खासगी बसेस आहेत. कोरोनामुळे इंधनावरील सवलत मागितली नव्हती, सरकारवरील संकटाचाही विचार केला होता.

Sameer Panditrao

पणजी: खासगी बसधारकांची इंधनावरील दोन वर्षांची सवलतीची थकीत रक्कम त्वरित द्यावी. आत्तापर्यंत केवळ आम्हाला गाजर दाखवण्याचे काम सरकारने केले आहे. इंधनाच्या सवलतीची थकीत व नवीन बस खरेदी योजनेची थकीत रक्कम अदा करावी. तरच आम्ही माझी बस योजनेविषयी विचार करू, असे सुदेश कळंगुटकर यांनी सांगितले.

रविवारी कदंब पठरावर झालेल्या खासगी बसमालक संघटनेच्या बैठकीत वरील विषयावर चर्चा झाल्याचे सांगत कळंगुटकर म्हणाले, एका बाजूला सरकार ‘माझी बस’ योजनेत सहभागी व्हा म्हणून सांगते, पण आम्हाला देय असलेली इंधनावरील सवलतीची रक्कम दोन वर्षांपासून मिळालेली नाही.

त्याशिवाय ज्या बसमालकांनी जुन्या बसेस बदलून नव्या बसेस खरेदी केल्या, त्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या योजनेतील निधीही दिला गेला नाही. सरकारकडून दरवेळी इंधनावरील सवलतीच्या थकीत रकमेविषयी आश्वासन दिले गेले आहे.

१८ कोटी रुपये थकीत आहेत. त्याशिवाय जुन्या बस बदलून नव्याने घेतलेल्या बसधारकांनाही अजून सरकारच्या योजनेतील रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे बसधारकांना बँकांचे हप्ते, तसेच बसचा देखभाल खर्च करणे अवघड झाले आहे. अनेक बसधारकांनी यावेळी आपल्या व्यथा मांडल्या.

राज्यात एकूण १३०० खासगी बसेस आहेत. कोरोनामुळे आम्ही इंधनावरील सवलत मागितली नव्हती, आम्ही सरकारवरील संकटाचाही विचार केला होता. पण वारंवार आम्ही मागणी करूनही सरकारकडून केवळ आश्वासने दिली गेली आहेत, आता आम्हाला जोपर्यंत इंधन न नव्या बसची देय असलेली सवलतीची थकीत रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही ‘माझी बस' योजनेविषयी विचार करणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT