Parking Issue In Goa Dainik Gomantak
गोवा

Parking Issue In Goa: म्हापशात कंत्राटी तत्त्वावर पे-पार्किंग

Parking Issue In Goa: साफसफाई सुरू: कदंब बसस्थानकाच्या खुल्या जागेचा वापर

दैनिक गोमन्तक

Parking Issue In Goa: म्हापसा येथील नवीन कदंब बसस्थानकाच्या पाठीमागील खुल्या जागेचा वापर सदुपयोगी करण्यासाठी कदंब महामंडळाने ठरविल्याचे दिसते. त्यानुसार, या जागेत दोन महिन्यांसाठी तात्पुरता तत्त्वावर कंत्राटदारद्वारे पे-पार्किंग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी जानेवारी 2022 मध्ये म्हापशातील या नवीन केटीसी बसस्थानकाचे लोकार्पण झाले. या अंतरिम आंतरराज्य नवीन केटीसीचे काम जीएसआयडीसीकडून करण्यात आले. कालांतराने जीएसआयडीसीने हे स्थानक कदंब वाहतूक महामंडळाकडे सुपूर्द केले.

जवळपास 20 हजार चौरस मीटर या जागेत रस्त्यासमोरील भाग हा अंतरिम बसस्थानकासाठी वापरला गेला व पाठीमागील जागा मोकळी (खुली) सोडण्यात आली. त्यामुळे या मोकळ्या जागेत अनेकदा रोजंदारीचे कामगार वर्गाकडून अतिक्रमण केले जायचे. हे बिगरगोमंतकीय तिथे झोपड्या उभारून वास्तव्य करू लागल्याने हा परिसर नवीन झोपडपट्टी बस्ती म्हणून नावारूपास येऊ लागलेली.

हे अतिक्रमण टाळण्यासाठी आता कदंब महामंडळाने खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करून सर्व झोपड्या काही दिवसांपूर्वीच हटविल्या. त्यानुसार, हा परिसर आता जेसीबीच्या साहाय्याने साफ करून तिथे स्वच्छतेचे काम सध्या चालू आहे.

या जागेत येत्या दोन महिन्यांसाठी तात्पुरता तत्त्वावर पे-पार्किंगची सुविधा चालू करून आढावा घेतला जाईल, अशी माहिती केटीसी सूत्रांकडून मिळाली आहे. वाहतुकीचा बोजवारा प्रचंड वाढला असून, मोठ्या संख्येने लोक बाजारहाटासाठी म्हापशात येतात.

परंतु, पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने आठवडी बाजार किंवा इतरत्र दिवशी लोक मिळेल तिथे वाहने पार्क करतात. त्यामुळे शहराला गलिच्छ रूप मिळते.

लवकरच निविदा

दोन महिन्यांच्या तात्पुरता तत्त्वावर ही संपूर्ण मोकळी जागा साफसफाई करून तिथे पे-पार्किंग सुरू केली जाईल. या दोन महिन्यांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच डिसेंबरअखेर किंवा त्यानंतर निविदा काढून या परिसरात पे-पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव असल्याचे केटीसी सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT