Pay Parking  Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंडावासीयांसाठी खूशखबर! जानेवारीपासून सुरु होणार Pay Parking सुविधा; दर निश्‍चितीबाबत लवकरच निर्णय

Pay Parking Project At Ponda: राज्यात अनेक शहरात ‘पे पार्किंग’ योजना लागू करण्यात आली आहे, मात्र फोंडा शहरात पे पार्किंग योजना नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जात होती. पार्किंगमध्ये शिस्त आणण्याबरोबरच महसूल वाढीसाठी पे पार्किंग योजना लागू करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pay Parking Project At Ponda

फोंडा: फोंडा शहरातही आता ‘पे पार्किंग’ करण्यात येणार असून यासंबंधीच्या आढावा बैठकीला नगराध्यक्ष तसेच पालिका अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते व इतर संबंधित खात्यांचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. पोलिसांना विश्‍वासात घेऊन हे ‘पे पार्किंग’ केले जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

विशेष म्हणजे फोंडा पोलिस स्थानकाच्या बाजूला पालिकेची जागा असून या ठिकाणी अनेक नादुरुस्त तसेच पोलिसांनी जप्त केलेली वाहने आणून ठेवली आहे. या ठिकाणी इतर लोकही वाहने पार्क करतात, त्यामुळे ही नादुरुस्त वाहने हटवण्यासाठी नगराध्यक्ष आनंद नाईक तसेच पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्यात सकाळी बैठक झाली त्यात पोलिस निरीक्षकांनी नगराध्यक्षांना आवश्‍यक सहकार्याची ग्वाही दिली.

राज्यात अनेक शहरात ‘पे पार्किंग’ योजना लागू करण्यात आली आहे, मात्र फोंडा शहरात पे पार्किंग योजना नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जात होती. पार्किंगमध्ये शिस्त आणण्याबरोबरच महसूल वाढीसाठी पे पार्किंग योजना लागू करण्यात येत आहे. मागच्या काळात पे पार्किंगचा विषय पालिकेच्या बैठकीत येत होता, त्याला आता मूर्त स्वरूप देण्यासाठी नगराध्यक्ष आनंद नाईक व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

सकाळी नगराध्यक्ष आनंद नाईक व इतर संबंधितांनी वारखंडे - फोंडा ते फोंडा जुने बसस्थानक तसेच वरचा बाजार आणि तिस्क - फोंडा आदी भागात फिरून पे पार्किंगची पाहणी केली. पे पार्किंगसाठी योग्य जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. भूमिगत वीजवाहिन्या तसेच मलनिस्सारण प्रकल्पाचे काम ज्या ठिकाणी होणार आहे, त्या जागा पे पार्किंगच्या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. रितेश नाईक यांनी फोंडा शहर परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी आवश्‍यक त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारून पार्किंगच्या जागा निश्‍चित केल्या होत्या.

दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी त्यामुळे सोयिस्कर ठरले होते. पार्किंगच्या जागा निश्‍चितीमुळे शहर परिसरातील वाहनांच्या पार्किंगमध्ये त्यामुळेच शिस्त आली होती. फोंड्यातील पे पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यात वारखंडे - फोंडा येथील मारुती मंदिर परिसर ते फोंडा बसस्थानक, चिरपूटकर दुकान ते वरचा बाजार तसेच तिस्क - फोंडा आदी जागेत पे पार्किंग केले जाणार आहे.

नो पार्किंगही अंमलात आणणार

फोंड्यात दादा वैद्य चौकातील कल्पना आईस्क्रीम पार्लर परिसर तसेच वारखंडे - फोंडा येथील सनईन परिसरातील जागा नो पार्किंग करण्यात येणार आहे. या ठिकाणी फुटपाथवरच दुचाकी पार्क केल्या जातात. या दुचाकी सकाळी पार्क केल्या जातात, त्या संध्याकाळी तसेच रात्री हटवल्या जातात.

दर निश्‍चिती लवकरच

फोंडा शहरातील पे पार्किंग योजनेत दुचाकी वाहनांसाठी ५ रुपये तर चारचाकी वाहनांसाठी शक्यतो १० रुपये दर आकारण्‍यात येणार आहे. दर निश्‍चिती लवकरच करण्यात येणार आहे. पे पार्किंग योजना लागू करण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी हाच दर निश्‍चित झाला होता, त्यासंबंधी पुनर्विचार होऊ शकतो.

फोंडावासीचे सहकार्य हवे!

फोंडा शहर परिसरात शिस्त आणण्यासाठी पालिकेने पे पार्किंगची योजना लागू करण्याचे निश्‍चित केले आहे. पुढील महिन्यात ही योजना कार्यान्वित होणार आहे. फोंडावासीयांनी तसेच फोंडा शहराला भेट देणाऱ्या वाहनचालकांनी या पे पार्किंग योजनेला सहकार्य करावे आणि सुंदर, शिस्तबद्ध फोंडा निर्माणासाठी सहकार्य करावे, असे नगराध्यक्ष आनंद नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT