
Comba Margao Gold Theft Case
मडगाव: ७२ लाख रुपये किमतीचे सोने चोरी प्रकरणात मडगाव पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले असून पोलिसांचे एक पथक संशयितांच्या शोधासाठी पश्चिम बंगाल राज्यात पोचले आहे. तेथे त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
बाणावली येथील सराफी व्यावसायिक प्रितेश लोटलीकर यांना त्याच्याकडे कामाला असलेल्या तीन कारागिरांनी तब्बल ७२ लाखांचे सोने पळवून नेले.
सुप्रोकोश मोंडल, संजॉय मोंडल व तपस जना अशी त्यांची नावे आहेत. ते तिघेही पश्चिम बंगालमधील आहेत. पोलिसाना त्यांचे पत्ते मिळवले असून त्यांच्या शोधात बंगालमध्ये पोलिस दाखल झाले आहेत.
मडगावच्या कोंब भागात वरील घटना घडली होती. शनिवारी मालक प्रितेश लोटलीकर यांना आपले ९५९ ग्रॅम सोने चोरीला गेल्याचे आढळून आले. त्याची किंमत ७२ लाख इतकी असून कामाला असलेले वरील तिघेही सापडत नसल्याने लोटलीकर यांचा त्यांच्यावर संशय बळावल्यामुळे त्यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसानी कलाम ३१६ अंतर्गत हे प्रकरण नोंदवून घेऊन लागलीच तपास कामालाही सुरुवात केली.
संशयित मूळ पश्चिम बंगाल राज्यातील असल्याने ते तेथेच पळून जाण्याची दाट शक्यता असून पोलिसानी शनिवारीच एक पथक त्या राज्यात पाठवून दिले आहे. या तपास कामात पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. तपासकामात बाधा येणार नाही, याची पोलिस दक्षता घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.