Pav Bhaji prices to go up in Goa Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांच्‍या जिव्हाळ्याची पावभाजीही महागणार...

गोमंतकीयांच्या खिशाला कात्री : पावाचा दर वाढल्यास परिणाम शक्य

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) 1 ऑक्टोबरपासून पावाचे (Bread) दर वाढविण्याची घोषणा ऑल गोवा बेकर्स संघटनेने बुधवारी केली. त्यानंतर राज्यातील नागरिकांची भ्रांत वाढली आहे. कारण हॉटेलमधील पावभाजीचेही (Pav Bhaji) दर वाढण्याची शक्यता आहे. याबाबत हॉटेलमालकांशी (Hotels) संपर्क साधला असता दर किती वाढवायचा याबाबत अद्याप निर्णय झाला नसला, तरी दर वाढवावे लागणार हे नक्की असल्‍याचे सांगण्यात आले.

पावभाजी हा गोवेकरांच्‍या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाव महागणार हे जवळपास नक्की झाले असल्यामुळे पावभाजी, वडापाव आदीचे दरही भडकणार आहेत. याबाबत हॉटेलचालक परेश गावस म्हणाले, पाव महागणार तर आम्हालाही दरवाढीशिवाय पर्याय नाही. हल्ली गोव्यातील पावभाजी हे केवळ गोवेकरांचेच खाद्य राहिले नाही, तर परप्रांतीयांनीदेखील पावभाजीला आपलेसे केले आहे. त्यामुळे पावभाजीचा दर वाढण्याचा फटका सगळ्यांनाच बसणार आहे.

एकिकडे कोविड महामारी, इंधन दरवाढीमुळे भडकलेली महागाई यामुळे हॉटेल व्‍यवसायांवर संकटाचे सावट आहे. त्यात आता कच्चे मालही महाग होत असल्याने केवळ पावभाजीच नाही, तर इतरही पदार्थांचे भाव वाढतील, असे एका हॉटेलमालकाने सांगितले. मजेची बाब अशी आहे की, सध्या राज्यात भाजीपाव 30 पासून 50 रुपयांपर्यंत विकला जातो, पण पावाच्या दर वाढीनंतर केवळ एक किंवा दोन रुपये दर वाढणार नाही, तर तो पाच रुपये वाढेल. कारण, हॉटेलमालकांसमोर चिल्लरचाही प्रश्‍न असेल.

गोव्याची लज्जत न्यारीच

अनेक ठिकाणी पावभाजी मिळते, पण, गोव्यातील पावभाजीची चव लज्जतदार असते. त्यामुळे या पावभाजीला अधिक मागणी असते. गोव्यातल्या प्रत्येक घरात सकाळच्या न्याहरीला पावभाजी असतेच. आता तर गोव्यात स्थायिक झालेले परप्रांतीय व पर्यटकांनाही गोव्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण पावभाजीने भूरळ घातली आहे.

"केवळ पावभाजीचेच दर वाढणार नाहीत, तर इतरही पदार्थांचे दर वाढवावे लागणार आहेत. कारण, कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. पावभाजी स्थानिकांच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे सरकारने पाव तयार करणाऱ्यांना अनुदान देऊन दरवाढ थांबविल्यास सगळ्यांनाच दिलासा मिळेल."

- विजय शेट्टी, हॉटेलचालक, पणजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Velsao Pale: वेळसाव-पाळे येथे तणाव! दुहेरी ट्रॅकच्या कामावरुन रहिवासी रस्त्यावर; ‘गोंयचो एकवट’ पुन्हा सक्रिय

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Goa News: खुशखबर! 'गोव्यात' मिळणार 'सरकारी' दराने भूखंड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cash For Job Scam: नोकरी घाेटाळ्‍याची दोरी 'वेगळ्यांच्याच' हातात! सीबीआय चौकशीची खासदार विरियातोंची मागणी

IFFI 2024: उत्‍सुकता वाढली! 'इफ्‍फी'त होणार तरंगणाऱ्या ‘यॉट’वर विशेष कार्यक्रम

SCROLL FOR NEXT