Patradevi Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents: पत्रादेवी टोलनाक्यावर जबरदस्त अपघात! दोघा अभियंत्यांना बसली धडक; तिघे गंभीर जखमी झाले

Patradevi Accident: अपघाताची माहिती मिळाताच स्थानिक व तिेथे जमलेल्या लोकांनी लगेच रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवले.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: संक्राळ, पत्रादेवी येथे रस्त्यावर टोल नाक्याचे युद्ध पातळीवर सुरू असलेल्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या दोघा अभियंत्यांना एका दुचाकी वाहनाने जोरदार ठोकर दिल्याने दुचाकीचालकासह तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

गोविंद नाईक (सावंतवाडी) आपल्या दुचाकीने टोल नाक्यावरून जात असता टोल नाक्याच्या कामाची पाहणी करणारे अभियंते रोहन कळंगुटकर व सहाय्यक अभियंते गौतम तारी यांना जोरदार ठोकर दिली. यात तिघेही जखमी झाले.

हा अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. मोटरसायक उसळून रस्त्याबाहेर फेकली गेली होती. या अपघाताची माहिती मिळाताच स्थानिक व तिेथे जमलेल्या लोकांनी लगेच रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवले.

वाहतूक पोलिस तैनात करा

संक्राळ येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर टोल नाक्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र येथे सुरक्षेचे कोणतेच उपाय योजलेले नाहीत, असे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने येथे तातडीने वाहतूक पोलिसाची तैनाती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT