Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

''आपल्या आयुष्यातील ध्येये आपल्याला पूढे घेऊन जातील''

Sumit Tambekar

75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पत्रादेवी येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी आपल्या आयुष्यातील ध्येयांचा पाठलाग करुया असे ते म्हणाले.

(Patradevi Martyr Memorial to be erected - Chief Minister Pramod Sawant)

नागरिकांना देशाने 76 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यामूळे लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी 75 कामे, पुढील आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे. त्याबद्दल 75 कामे सविस्तरपणे यादी काढत ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहीजे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सावंत पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या आयुष्यातील ध्येये आपल्याला पूढे घेऊन जातील. आणि देशाचा नागरिक पूढे जाणे म्हणजेच देश पूढे जाणे असा आहे. त्यामूळे आपण सर्वजण स्वत:ची ध्येये निवडूण त्यासाठी अहोरात्र कष्ट करुया असे ती ते यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रादेवी येथे गोवा सरकार हुतात्मा स्मारक उभारणार आहे. त्यासाठी मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आश्वासित करतो असे ही ते म्हणाले. कारण पत्रादेवी हुतात्मा उभारण्यात येणारे स्मारक हे पुढील पिढीला प्रेरणा देणारे असेल.

ज्या - ज्या हूतात्म्यांनी रणसंग्रामात आपले बलिदान दिले, त्यांची आठवण या निमित्ताने कायम आपल्यासोबत राहील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी आमदार जित आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ही या कार्यक्रमास उपस्थितीत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT