CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

गोवा महाराष्ट्राचा जिल्हा असल्यासारखी वागणूक यापूर्वी केंद्राने दिली, मोदींनी गोव्याला दिली खरी ओळख - CM सावंत

भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याला दिली खरी ओळख मिळवून दिली - CM सावंत

Pramod Yadav

Pramod Sawant: यापूर्वी गोवा महाराष्ट्राचा जिल्हा असल्यासारखी वागणूक केंद्र सरकारने दिली. पण, सध्याच्या भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याला दिली खरी ओळख मिळवून दिली, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केले.

आज (शनिवारी, दि.06) साखळी येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सावंत यांच्या वक्तव्याचा रोख काँग्रेसकडे असल्याने आता काँग्रेस नेते याप्रकरणी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी पार पडलेल्या 'हॅलो गोंयकार' कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात पारंपरिक पद्धतीनेच रेती काढण्यासाठी लवकरच परवानगी दिली जाईल असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र व कर्नाटकातून प्रत्येक ट्रकमागे 500 रुपये शुल्क भरून रेती आणण्यास सुरवात झाली आहे. लवकरच शापोरा नदीत रेती काढण्यासाठी परवाने जारी केले जातील. मांडवी व झुआरी नदीतून रेती काढण्यासाठी परवाने देण्यास किमान 4 महिने लागतील, असे ते कार्यक्रमात म्हणाले.

गोवा राज्याच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवदर्शन योजनेत लवकरच अयोध्येचा समावेश केला जाईल, असे संकेतही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दूरदर्शनवरील ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT