Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Sfx Exposition Goa: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाचा महासोहळा गुरुवार, २१ रोजीपासून सुरू झाला. देशी-विदेशी भाविक जुने गोवे येथे गर्दी करून मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले होते.
St. Xaviers Body Exposition, St Francis Xavier Exposition 2024-25
Saint Francis Xavier Exposition InaugurationDainik Gomantak
Published on
Updated on

Saint Francis Xavier Exposition 2024 Inauguration

तिसवाडी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनाचा महासोहळा गुरुवार, २१ रोजीपासून सुरू झाला. देशी-विदेशी भाविक जुने गोवे येथे गर्दी करून मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले होते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी सोहळ्याची प्रार्थना घेऊन सोहळ्याचा शुभारंभ केला. तत्पूर्वी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरांच्या शवाचे दर्शन घेतले.

सकाळी ९.३० वा.च्या सुमारास प्रार्थनासभा सुरू झाली. त्यात कार्डिनल फेर्रांव यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या जीवन आणि केलेल्या लोककल्याणावर प्रकाश टाकला, तसेच यंदाचा शवप्रदर्शन सोहळा उत्तमरीत्या आयोजित केल्याबद्दल सरकार आणि चर्च संघटनेचे कौतुक केले. कार्डिनल फेर्रांव यांच्या भाषणानंतर चर्चच्या स्वयंसेवकांनी बासेलिका ते से कॅथिड्रल चर्चदरम्यान मानवी साखळी तयार केली. त्यानंतर सिस्टर, फादर यांनीदेखील यात साखळी केली. नंतर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव सजवलेल्या वाहनावरून आणण्यात आले. त्यामागे ब्रास बँडच्या मधुर ध्वनीने ते प्रदर्शनासाठी कॅथिड्रलच्या परिसरात ठेवेले गेले.

दुपारी ३ वा. भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले असून सायंकाळी ६ वा. संपुष्टात आले. उद्यापासून सकाळी ७ वा. ते सायंकाळी ६ वा. दरम्यान दर्शन घेता येईल. भाविकांसाठी शौचालय, राहण्याची सोय, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था याची तयारी करण्यात आली आहे.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन घेण्यासाठी देशी-विदेशी भाविकांनी गर्दी केली. श्रीलंका, इंग्लंड, स्पेन, रशिया व इतर देशातील नागरिक येथे दर्शन घेण्यासाठी आलेले दिसले. मोठ्या संख्येत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र येथील भाविकदेखील आले आहेत.

४५ दिवस फेरी

यंदा शवप्रदर्शन सोहळा असल्यामुळे ४५ दिवस फेरी चालणार असून ओला आणि सुका कचरा व्यवस्थापानासाठी दुकानदारांना सूचना देण्यात आली आहे. वाहतूक सुरळीतपणे चालणार यासाठी वाहतूक पोलिसांकडून सूचना देण्यात आली आहे. तसेच पार्किंगची सोयदेखील करण्यात आली आहे.

St. Xaviers Body Exposition, St Francis Xavier Exposition 2024-25
Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

मोठा फौजफाटा

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला गेला असून उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त करण्यात आला आहे. विविध ठिकाणी पोलिसांनी टॉवर उभारले आहेत. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरा अशी व्यवस्था दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com