Panaji Bus stand  Dainik Gomantak
गोवा

Panaji Bus stand : पणजी बस स्थानकावरील बाकांमुळे प्रवाशांची गैरसोय

दिव्यांग, महिलांचा विचार करण्याची केली मागणी

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को ते मडगाव आणि पणजी या शटल बसमध्ये जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना प्रवाशांना बसण्यासाठी घालण्यात आलेले बाक लोखंडी रॉडचे असल्याने या सुविधेचा वापर म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि गरोदर महिलांना गैरसोयीचा ठरत आहे. गोवा कॅनने याची दखल घेऊन ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत सेवेतील कमतरता आणि अपंग व्यक्तिंचे अधिकार अधिनियम 2016 अंतर्गत राज्य आयुक्त यांच्याकडे नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाकडे हे प्रकरण नेण्याचा निर्णय घेतला आहे.

(Passengers inconvenienced by benches at Vasco Madgaon Panaji bus station)

खारीवाडा टि. बी .कुन्हा चौकात उभारण्यात आलेल्या कदंब शटल सर्विस बस थांब्यावर टिकीट काऊंटरच्या शेजारी प्रवासांना बसण्यासाठी घातलेले बाक अपुरे ठरत आहेत. एखाद्या वेळी बस येण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यत प्रवाशांची लांबच्या लांब रांग लागते. यावेळी बसण्यासाठी रॉडचा वापर करून बाक तयार केले आहे. पणजी व मडगाव तिकीट काऊंटरवर तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहीलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी लांबच्या लांब एकच बाक तयार करूनमध्ये त्याचे दोन भागात रूपांतर केले आहे.

हे बाक बसण्यास अपूरे ठरत आहेत. तसेच रॉडचा वापर करून बांधलेल्या या सुविधेचा वापर ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि गरोदर महिलाही करतात. पण या लोकांना या तुटपुंज्या रॉडच्या बाकावर बसणे म्हणजे गैरसोईचे ठरत आहे. शटल काउंटर कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी लोकांनी झोपू नये म्हणून या प्रकारची सीटींग बाक केली असल्याचे सांगितले.

दरम्यान गोवा कॅन या संघटनेने याची दखल घेऊन संरक्षण कायदा 2019 अंतर्गत सेवेतील कमतरता आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 अंतर्गत राज्य आयुक्त यांच्याकडे नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाकडे सदर प्रकरण नेण्याचा निर्णय घेतला आहे, असे गोवा कॅनचे रॉलण्ड मार्टिन्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT