terrorist attack Pahalgam Dainik Gomantak
गोवा

Deviya Rane: पहलगाम दहशतवादी हल्ला! मुख्यमंत्री सावंत यांच्यानंतर आमदार देविया राणे यांचाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Deviya Rane birthday cancelled: मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर पर्ये-सत्तरीच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय

Akshata Chhatre

सत्तरी: पहलगाम श्रीनगर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस असतो. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर पर्ये-सत्तरीच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.

पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली म्हणून देविया राणे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. डॉ. देविया राणे यांचा २५ एप्रिल रोजी वाढदिवस असतो. वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांनी हितचिंतकांना वाढदिवसाचं आयोजन किंवा घरी येऊन शुभेच्छा न देण्याचं आवाहन केलं आहे.

या हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप लोकांच्या आत्म्याला शांती मिळो असं म्हणत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.

या कठीण काळात पीडित कुटुंबासोबत आपण सर्वजण उभं राहुयात आणि त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करूया असं आमदार देविया राणे म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवस रद्द

२४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मडगाव, पणजी, म्हापसा येथील भाजप कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपलब्ध असणार होते. तसंच मुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच साखळी येथील रवींद्र भवनात जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार होते. मात्र आता हे सगळे कार्यक्रम रद्द करण्‍यात आले आहेत.

काजू महोत्सव पुढे ढकलला

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पूर्वनियोजित २५ ते २७ एप्रिल यादरम्यान होणारा गोवा काजू महोत्सव पुढे ढकलण्‍यात आलाय. या हल्‍ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना आम्ही श्रद्धांजली वाहत असून त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा आमदार डॉ. देविया राणे यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT