Narendra Modi Goa visit | Dainik Gomantak
गोवा

PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

Goa Partgali Matha Rama Statue: गोमंतकीयांनी मूळ संस्कृती टिकवून ठेवली. यात पर्तगाळ जीवोत्तम मठाचाही मोठा वाटा आहे. पर्तगाळ मठ हे समाज जोडणारे ऊर्जा केंद्र आहे, असे गौरवोदगार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्तगाळ/काणकोण : गोव्याची मंदिरे आणि संस्कृती, भाषेवर अनेकदा आक्रमण झाले, तरीही या संकटांना सामोरे जात गोमंतकीयांनी मूळ संस्कृती टिकवून ठेवली. यात गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचाही मोठा वाटा आहे. पर्तगाळ मठ हे समाज जोडणारे ऊर्जा केंद्र आहे, असे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या स्थापनेला ५५० वर्षे पूर्ण होत असल्याने येथे आयोजिलेल्या सार्थ पंचशताब्दी सोहळ्यानिमित्त मठ संकुल परिसरात उभारलेल्या ७७ फूट उंच श्रीराम मूर्तीचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मोदी म्हणाले, की अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा धर्मध्वज फडकवण्याचा मला मान मिळाला आणि आता दक्षिण अयोध्या म्हणून नावारूपास येत असलेल्या पर्तगाळ येथे आशियातील सर्वांत उंच श्रीराम मूर्तीचे अनावरण करण्याचा योग येतो. माझ्यासाठी हे दोन्ही ‘अभूतपूर्व’ असे योग असून मी धन्य झालो आहे. यावेळी विशेष टपाल तिकिटाचे तसेच ५५० रुपयांच्या विशेष नाण्याचेही अनावरण मोदी यांच्या हस्ते केले.

देशवासीयांना पंतप्रधानांकडून नऊ संकल्पांचा आग्रह

  पर्यावरण रक्षण धर्म मानावा, जलसंरक्षण करा

  झाडे लावा, झाडे जगवा

  स्वच्छता मिशन सवयीचा भाग बनवा

  स्वदेशीचा अंगिकार करा, (व्होकल फॉर लोकल) मंत्र जपा

  देश दर्शन करावे (देशाचे विविध प्रांत पहावेत)

  नैसर्गिक शेतीवर भर द्यावा

  ‘श्री अन्न मिलेट’ स्वीकारा, तेल कमी वापरा. आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगिकार करा.

  योगसाधना व खेळ यांचा अंगिकार करावा.

  कोणत्याही मार्गाने गरिबांची सेवा करावी.

५५० रुपयांच्या नाण्याचे अनावरण

गोकर्ण पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन सोहळ्यात केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेले ५५० रुपयांच्या नाण्याचे आज पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हे नाणे हैदराबाद येथील टांकसाळीत तयार करण्यात आले आहे. हे नाणे ३५ ग्रॅम वजनाचे असून त्यामध्ये ५० टक्के चांदी, ४ टक्के तांबे, तसेच जस्त, निकेल यांचे मिश्रण आहे.

मठांमुळे गोव्याची संस्कृती अबाधित!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यावर भोज, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, बहामनी, विजयनगर, विजापूरची आदिलशाही आणि पोर्तुगीज राजवटीने राज्य केले. काहींनी त्यांची संस्कृती गोव्यावर लादण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील मठ आणि मंदिरांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली. यात पर्तगाळ जीवोत्तम मठाचेही फार मोठे योगदान आहे.

पंतप्रधानांचे गोव्याशी अतूट नाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्याशी अतूट नाते आहे, असे श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामी म्हणाले. ते म्हणाले, की २०१३ साली लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपच्या गोव्यातील बैठकीत एकमुखाने ठरविण्यात आले. त्यापूर्वीही काही घटना गोव्यात मोदींच्या बाबतीत घडल्या. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या पुत्राला जन्म दिला आहे. भगवान श्रीकृष्णाचा जिथे जन्म झाला, त्याच प्रांतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला आहे.

श्रीकृष्ण जसे सर्वसमावेशक विचार करत होते, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदीही सर्वसमावेशक विचार करतात. कोविड काळात त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. कोविड लस फक्त देशातच नव्हे, तर जगातील अन्य देशांनाही त्यांनी उपलब्ध करून दिली. चहा विकत त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. मात्र, आता चहा पिता पिता आम्ही पंतप्रधान मोदींची चर्चा करतो आहोत.

श्रीरामाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच ‘सबका साथ, सबका विकास’ हे त्यांना साध्य होणार आहे. यावेळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीराम हे प्रेरणास्रोत आहे. पर्तगाळ मठ हे सनातन धर्माचे व्यासपीठ आहे. त्याला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न विद्यमान श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामीजींनी केला, असे धेंपे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT