partagal Dainik Gomantak
गोवा

पर्तगाळीत पुण्यतिथी महोत्सव सुरु

मठानुयायांची उसळली गर्दीः राज्यपाल,मंत्री ढवळीकरांची हजेरी

दैनिक गोमन्तक

काणकोण: श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी मठांत समाधीस्त मठाधिश श्रीमद् विद्याधिराज तीर्थ यांच्या प्रथम पुण्यतिथी महोत्सवास आज विविध धार्मिक विधींनी प्रारंभ झाला. या महोत्सवानिमित्ताने पर्तगाळी मठात गोवा तसेच शेजारी राज्यातील मठानुयाची गर्दी उसळली आहे. आज सकाळीस्वामीजी श्रीविद्याधिश तिर्थ यांजहस्ते मठ प्राकारात बांधण्यात आलेल्या सुसज्ज खोल्यांचे उद्घाटन झाले. याच संकुलातील विद्याधिराज भवनाचे उद्घाटन उद्या शनिवारी होणार आहे.

आज सकाळी राज्यपाल श्रीधर पिल्लई यांनी सपत्नीक पर्तगाळीत येऊन या सोहळ्याप्रती सदिच्छा व्यक्त केल्या. मठसमितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे व सौ. पल्लवी यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना मठात नेले. दुपारी वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनीही मठात उपस्थिती लावली. सायंकाळी कर्नाटकातील मंडळीचाभजनाचा कार्यक्रम व नंतर दीपोत्सव झाला.

उद्या शनिवारी गत स्वामीजींच्या व्रुंदावनप्रतिष्ठा व सायंकाळी समभाकार्यक्रम व नंतर राहुल देशपांडे व आनंद भाटे यांची संगीत मैफल होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांचे सहकारी मंत्री व आमदार पर्तगाळी मठात उपस्थिती लावतील असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT