Ram Digvijay Rath Yatra Goa Dainik Gomantak
गोवा

मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

Ram Digvijay Rath Yatra Goa: पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापन वर्षानिमित्त सध्या देशभर संचार करीत असलेल्या राम दिग्विजय रथ यात्रेचे मडगावातही आगमन होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापन वर्षानिमित्त सध्या देशभर संचार करीत असलेल्या राम दिग्विजय रथ यात्रेचे मडगावातही आगमन होणार आहे.

२५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रिवण मठातून ही रथयात्रा निघणार असून रावणफोंड जंक्शनवर संध्याकाळी ५ वाजता पोहोचेल. यावेळी मठग्राममधील सर्व अनुयायांनी व भक्तगणांनी तिथे उपस्थिती लावावी असे बलराम केंद्र, मठग्राम मठ संकुलाचे अध्यक्ष प्रवास नायक यांनी आवाहन केले आहे.

दिग्विजय रथ नंतर कोकण रेल्वे स्थानक, रेल्वे उड्डाणपूल, नगरपालिका चौक, लोहिया मैदान रस्ता, सिने विशांत आके रस्ता, पांडव कपेल, जुने चौगुले कॉलेज, बोलशे सर्कल, मठ रस्ता या मार्गावरून बलराम केंद्र, मठग्राम मठ संकूल, जिवोत्तमनगर घोगळ इथे आगमन होणार आहे.

हा दिग्विजय रथ रस्त्यावरून जाताना कित्येक अनुनायींच्या, भक्तगणांच्या घरासमोरून जाईल व प्रत्येकाला रथाला आरती दाखवणे, पुष्पहार अर्पण करण्याची इच्छा असेल. पण वेळ कमी असल्याने रथ कुठेही थांबा घेणार नाही. ज्यांना आरती दाखवायची असेल किंवा पुष्पहार अर्पण करायचे असेल त्यांनी बलराम केंद्र, मठग्राम मठ संकुलात उपस्थित लावावी असे कळविण्यात आले आहे.

गोकर्ण पर्तगाळी मठात ५५०व्या वर्धापनदिन महोत्सवात ३ डिसेंबर रोजी संध्या. ७.३० वाजता डॉ. प्रवीण गावकर व ७६ साथी कलाकारांचा स्वर झंकार हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मराठी व हिंदी गीतांचा मिलाफ असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

SCROLL FOR NEXT