Kala Academy: सध्या राज्यात पडझडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच कला अकादमीबाबत अशीच एक घटना समोर आली आहे. कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचा काही भाग कोसळला आहे. या सभागृहाचे बांधकाम नवीनच असून यासाठी 55 कोटींहून अधिक पैसे करण्यात आले होते.
हे नेमके कशामुळे झाले याबाबत अद्याप कळू शकले नाही.
या घटनेबाबत कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, सदर इमारत ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हवाली केली असल्याने त्यावर आपण काहीही टिपण्णी करणे योग्य ठरणार नाही.
हा हॉल कला अकादमीच्या मूळ संरचनेचा भाग नसून तो एक वेगळा स्वतंत्र हॉल आहे. त्यामुळे जोपर्यंत बांधकाम खात्याचा अहवाल मिळत नाही तोवर यावर भाष्य करता येणार नाही.
शिवाय, त्या सभागृहाला बीम आणि कॉलम नसून फक्त आय बीम होते. त्यामुळे सदर सभागृहाचा स्लॅब कोसळण्यामागे नेमके कारण काय, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालातूनच स्पष्ट होऊ शकेल. तरी आम्हाला या सर्व प्रकरणाच्या जबाबदारीची जाणीव असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विजय सरदेसाईंनी यावरून सरकारवर खरमरीत टीका केली आहे. ते म्हणाले की, आज कोसळलेल्या कला अकादमीच्या नवीन इमारतीचे सभागृह हे सरकारच्या भ्रष्टाचाराचेच एक उदाहरण आहे.
हा मुद्दा मी सातत्याने मांडला आहे; पण मुख्यमंत्र्यांनी कला आणि संस्कृती मंत्र्यांना क्लीन चीट दिल्यामुळे यावर काहीच झाले नाही.
आता विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्वरीत याप्रकरणाची चौकशी करून अकार्यक्षम आणि भ्रष्ट मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.