Kala Academy Slab Collapsed Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Slab Collapsed: गोव्याचा ताजमहाल पुन्हा कोसळला, कला अकादमीच्या सिलिंगला पावसाचा फटका

Kala Academy Slab Collapsed: गेल्या वर्षी अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याने मोठा गोंधळ झाला होता.

Pramod Yadav

Kala Academy Slab Collapsed

नुकतेच नूतनीकरण केलेल्या कला अकादमीचे छत पुन्हा एकदा कोसळल्याचे समोर आले आहे. शनिवारी राज्यात हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे छत गळती झाली. दरम्यान, सोमवारी सकाळी फॉल्स सिलिंगचा काही भाग कोसळल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर पुन्हा पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळला आहे.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात कोसळला होता खुल्या रंगमंचाचा स्लॅब

गेल्यावर्षी जुलै महिन्यात अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा स्लॅब मध्यरात्रीच्या वेळेस कोसळल्याची घटना घडली होती. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेवरुन विरोधकांनी रान उठवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या कामाचा संबंध ताजमहालच्या कामाशी केला होता.

दरम्यान, सुरुवातीला खुल्या रंगमंचाचा स्लॅब आणि आता फॉल्स सिलिंगचा काही भाग कोसळल्याने नूतनीकरणाच्या कामावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोट्यवधीचे काम आणि घोटाळ्याचा आरोप

कला अकादमीचे नूतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला असून, कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अकादमीच्या नूतनीकरणासाठी कोणतीही निविदा न काढता तब्बल 55 कोटी रुपये खर्च करण्यात आले. दरम्यान, निविदा न काढता काम केल्याने नूतनीकरण कामात घोटाळ्याचा आरोप करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi: वाळपईत शिगमोत्सवात राडा! 2 ‘रोमटामेळ’ पथकांमध्ये मारामारी; समितीच्या प्रयत्नांमुळे शोभायात्रा शांततेत

Goa Politics: खरी कुजबुज; ...म्‍हणून भाजपकडून रितेशसह दळवींचे नाव

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीतही विरोधकांच्‍या एकीत बेकी! आप, आरजीपीही देणार उमेदवार; 'मगोप' समर्थकांचा भाटीकरांना पाठिंबा

'आधी मुलाचा गळा घोटला, कीटकनाशक पिऊन संपवले जीवन'; बाप-लेक मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, चिठ्ठीमुळे उलगडले रहस्य

Rabies Vaccine Shortage: राज्यात रेबीजच्या लसींचा तुटवडा! सर्वसामान्य रुग्णांचे प्राण टांगणीला; धोका उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT