Overseas Citizenship Of India
Overseas Citizenship Of IndiaDainik Gomantak

OCI Card : ‘ओसीआय कार्ड’ प्रश्‍नी गोमंतकीयांना दिलासा; पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र कार्ड घेण्यास पुरेसे

OCI Card : ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट करून गोमंतकीयांना दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली.
Published on

OCI Card :

मडगाव, पोर्तुगालात जन्मनोंदणी होऊनही ती माहिती भारतीय पासपोर्ट खात्याला न दिल्याने कित्येकांना अनिवासी भारतीय नागरिक (ओसीआय) परवाना देण्यास बंदी आणल्याने अशी नोंद झालेले हजारो गोमंतकीयांचे नागरिकत्व अधांतरी राहिले होते.

मात्र, आता भारतीय पासपोर्ट रद्द केल्याचा परवानाही हे ओसीआय कार्ड घेण्यास पुरेसे आहे, असा आदेश भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याने जारी केल्याने हजारो गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे.

यासंबंधी गोवा सरकारने केंद्राकडे मागणी केली होती. केंद्र सरकारने ती मागणी पूर्ण केली. ज्यांची पोर्तुगीज नागरिक म्हणून नोंद झाली आहेे; पण त्यांनी ही माहिती भारत सरकारला दिली नव्हती, त्यांना ही सवलत देण्याची मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केली होती.

ज्यांची विदेशी नागरिक म्हणून नोंद झाली आहे; पण त्यांनी ही माहिती भारत सरकारला दिलेली नाही, अशा भारतीय नागरिकांचे पासपोर्ट नूतनीकरण परराष्ट्र व्यवहार खात्याच्या आदेशानुसार थांबविले होते. त्यामुळे अशा नागरिकांचे भारतीय नागरिकत्व रद्द होऊन त्यांची स्थिती धड भारतीय नागरिक नाही आणि विदेशी नागरिकही नाही, अशी झाली होती. विशेषतः पोर्तुगालात नागरिक म्हणून नोंदणी झालेल्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व गृहमंत्रालयाकडे कसोशीने प्रयत्न केले होते. जे आपला पासपोर्ट सरेंडर करीत त्यांना ओसीआय कार्ड दिले जात होते. मात्र, रिजेक्टेडना हे कार्ड दिले जात नव्हते. त्यामुळे अनेक गोमंतकीयांवर अन्याय होत होता.

आता रिजेक्टेडनासुद्धा हे कार्ड मिळणार आहे. त्यामुळे गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे, ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आमच्या प्रयत्नांना यश आले आहे व आम्ही हा गुंता सोडविणार, असे जे वचन दिले होते त्याची पूर्तता करण्यासही आम्हाला यश प्राप्त झाले आहे.

‘मोदी है तो मुमकीन आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांतील प्रश्‍न एकमार्गी सोडविले जात आहेत. त्यांना या प्रश्‍नांची जाण असून, ते जातीने यात लक्ष घालत आहेत. असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हा प्रश्र्न सोडविण्यास मुख्यमंत्री, एनआरआय कमिशनर नरेंद्र सावईकर यांच्याबरोबर पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेराही प्रयत्न करीत होते.

यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता सिक्वेरा म्हणाले की, मी अजून परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश पाहिलेला नाही आणि वाचलेलाही नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकणार नाही.

Overseas Citizenship Of India
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

आमच्या प्रयत्नांना यश : मुख्यमंत्री

ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट करून गोमंतकीयांना दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली. लोकसभा निवडणुका जाहीर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com