Viral Video Danik Gomantak
गोवा

Mapusa: दसऱ्या दिवशीच युवकावर काळाचा घाला; विजेच्या झटक्याने ओढवला मृत्यू

वाशिंग सेंटरमधील कामगाराचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

म्हापसा: पेडे-म्हापसा येथील एका वाशिंग सेंटरमधील मजूर कामगाराचा विद्युत प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाला. परशुराम लमाणी (26, रा. कोलवाळ व मूळ कर्नाटक) असे मयताचे नाव आहे. आज दसरा असताना सर्वत्र लगबग सुरु होती मात्र सणात घटल्याने परिसरात नागरिकात हळहळ होती.

(Parshuram Lamani dies due to electric shock at Mapusa)

ही घटना सकाळी 7 च्या सुमारास घडली. बुधवारी, दसरा असल्याने म्हापसा येथील गॅरेजमध्ये गाड्या धुण्यासाठी मयत परशुराम हा लवकर कामावर आलेला. यावेळी गॅरेजमधील गाड्या धुण्याच्या वॉशिंग रॅम्पवर तो चढला होता. तेव्हा, पाण्यातून त्याला विजेचा झटका लागला व तिथेच तो पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मयत हा गॅरेजमध्ये एकटाच होता.

सकाळी 8 च्या सुमारास गॅरेज मालक वॉशींग सेंटरवर आले असता, त्यांना मयत हा निपचित पडलेला दिसला. लगेच त्यांनी 108 रूग्णवाहिकेला पाचारण केले. रूग्णवाहिकेतून त्याला जिल्हा इस्पितळात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. तसेच मयताचा मृत्यू विजेच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर म्हापसा पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील व सहकार्‍यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह गोमेकॉत पाठविल्यानंतर तेथे शवविच्छेदन झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT