Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Stabbing Case Parra Goa: पर्ये येथील मॅनेजमेंट कॉलेजजवळ पार्किंगच्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने एका युवकावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

Sameer Panditrao

वाळपई: पर्ये येथील मॅनेजमेंट कॉलेजजवळ पार्किंगच्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने एका युवकावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. देऊळवाडा-कारापूर येथील योगेश सुभाष राणे (वय २७ वर्षे) याने हाऊसिंग बोर्ड, साखळी येथील अनिकेत सिंगबाळ (वय २७ वर्षे) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

वाळपई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संशयित योगेश राणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय प्रथमेश गावस करीत आहेत. ही कारवाई उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि डिचोलीचे उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

जखमी युवकाची प्रकृती स्थिर

प्राथमिक माहितीनुसार, पार्किंगच्या जागेवरून योगेश राणे आणि अनिकेत सिंगबाळ या दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. त्या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. योगेशने अनिकेतवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने तो जखमी झाला. यावेळी अनिकेतला तातडीने साखळी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेले. नंतर पुढील उपचारासाठी त्याला गोमेकॉत हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

SCROLL FOR NEXT