Parliamentary Public Accounts Committee visits Goa Naval Area Dainik Gomantak
गोवा

संसदीय लोकलेखा समितीची गोवा नौदल क्षेत्राला भेट...

गोव्याचे प्रभारी नौदल अधिकारी कमोडोर आशिष गोयल यांनी या प्रतिनिधींचे स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

वास्को:संसदीय लोकलेखा समितीने गोवा नौदल क्षेत्राला भेट दिली अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या अकरा सदस्यीय लोकलेखा समितीने लोकसभा सचिवालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत, नूकतीच गोवा नौदल क्षेत्राला भेट दिली.

गोव्याचे प्रभारी नौदल अधिकारी कमोडोर आशिष गोयल यांनी या प्रतिनिधींचे स्वागत केले. समितीने नौदल हवाई स्टेशन आयएनएस हंसाला भेट दिली आणि तेथे गोवा क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल फिलिपोस जी प्यनुमूतिल यांनी स्वागत केले.

समितीसमोर भारतीय नौदलाच्या हवाई ऑपरेशन्सचे सादरीकरण करण्यात आले. ज्यामध्ये भारतीय नौदलाने सुरू केलेल्या आधुनिकीकरण प्रकल्पांची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली. त्यानंतर प्रतिनिधींनी फ्लाय-पास्टसह ऑपरेशनल प्रात्यक्षिक पाहिले.मिग 29 के, डोनियर 228, कामोव 31 आणि एएलएच विमाने. बोईंग पी-8 आय आणि आयएल 38 एसडी विमानांच्या स्थिर प्रदर्शनात पीएसी सदस्यांना लाँग रेंज मेरीटाईम रीओनेसान्स ऑपरेशन्सबद्दल देखील माहिती देण्यात आली. त्यानंतर, त्यांना नेव्हल एव्हिएशन म्युझियममध्ये व्हिंटेज विमाने, इंजिन आणि शस्त्रास्त्रांचा मार्गदर्शनपर दौरा देण्यात आला जो भारतीय नौदलाच्या हवाई दलाचा समृद्ध इतिहास आणि वारसा प्रदर्शित करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू,भाजपकडे अधिक खासदार; पण विरोधकांना 'क्रॉस व्होटिंग'ची आशा

Bits Pilani: 9 महिन्यांत पाच मृत्यू का झाले? विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कसे दूर होणार?

Goa Opinion: दखल घेतली जात नसेल तर 'न्यायसंस्थांचा' उपयोग तो काय?

SCROLL FOR NEXT