म्हापशात अहोरात्र बेघरांचा मुक्तसंचार

प्रसाधनगृहे बंद: परप्रांतीयांकडून खुल्या जागेतच शौचविधी
Free movement of homeless people day and night in Mapusa
Free movement of homeless people day and night in MapusaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: म्हापसा बसस्थानक व बाजारपेठ परिसरात रात्रभर परप्रांतीय निराधार तथा बेघरांचा मुक्त संचार असतो. पालिकेची प्रसाधनगृहे बंद असल्याने तसेच अन्य शौचालयांत शुल्क आकारले जात असल्याने खुल्या जागेतच ते नैसर्गिक शौचविधी करीत आहेत.

रात्रीच्या वेळी बसस्थानकावर तसेच बाजारपेठ संकुलाच्या वऱ्हांड्यातील फूटपाथवर काही परप्रांतीय झोपत असतात. त्यात पुरुष व महिलांचाही समावेश असतो. त्यापैकी बहुतांश जण मद्यप्राशन करून एकमेकांशी मोठमोठ्याने भांडत असतात. त्यांची तेथील दंगामस्ती नित्याचीच झालेली आहे. काही महिलादेखील मद्यप्राशन करून तावातावाने बोलत असतात.

Free movement of homeless people day and night in Mapusa
म्हापसा बाजाराची प्रवेशद्वारे पुन्हा व्यापाऱ्यांनी व्यापली!

म्हापसा बाजारपेठेत रात्रीच्या वेळी होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांमध्ये त्यांचाही सहभाग असू शकतो, असे शहरातील दुकानदारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी म्हापशातील एक सराफी दुकान रात्रीच्या वेळी फोडल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तेथून हाकलून लावण्यासंदर्भात पोलिसांनी विशेष काळजी अद्याप घेतलेली नाही, असे बोलले जात आहे. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी परप्रांतीयांची योग्य झडती घ्यावी, अशी मागणी काही दुकानदारांनी केली.

अलीकडेच म्हापशातील निराधारांना पोलिसांच्या साहाय्याने आश्रमात नेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम आनंद निकेतन या संस्थेने राबवला आहे. त्यामुळे काही अंशी ही समस्या आटोक्यात आली आहे. मनोरुग्णांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एखाद्या सुधारगृहात करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com