No parking in Bicholim Dainik Gomantak
गोवा

No parking in Bicholim: डिचोली शहरात पार्किंगची समस्या कायम

बाजारात गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडीत वाढ, पोलिस तैनात करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

No parking in Bicholim: पार्किंग समस्येने ग्रासलेल्या डिचोली शहरात ''ट्रॅफिक जाम''चे प्रकार नित्याचेच घडले आहेत. चतुर्थीच्या तोंडावर सध्या शहरात खास करुन बाजारात ही समस्या वाढली असून, चतुर्थीच्या बाजारावेळी ही समस्या नियंत्रणात आणताना वाहतूक पोलिसांसह पालिकेलाही कसरत करावी लागणार आहे. अशीच चिन्हे सध्या दिसून येत आहे. सध्या प्रामुख्याने बाजारात ही समस्या अधिक आहे.

दरवर्षी चतुर्थीच्या आधी दोन दिवस म्हणजेच माटोळी बाजार भरतो, त्यावेळी बाजारात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येते. चतुर्थी बाजारातील गर्दीमुळे बाजारात समस्या निर्माण होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पालिकेतर्फे ही उपाययोजना करण्यात येते. यंदाही ही उपाययोजना करण्यात येणार असली, तरी सध्याची स्थिती पाहता चतुर्थीकाळात बाजाराबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या उद्‍भवण्‍याची शक्यता आहे. चतुर्थीच्या बाजारा काळात वाहतूक पोलिस तैनात करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

बेशिस्त पार्किंग : शहरातील काही जागा पालिकेने पार्किंगसाठी आरक्षित केल्या आहेत. तरीदेखील बेशिस्त पार्किंगचे प्रकार वाढले आहेत. शहरातील सरकारी शाळेसमोरील रस्ता तसेच न्यायालय इमारतीकडून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर तर ही समस्या नित्याचीच झाली आहे. बेशिस्त पार्किंगमुळे अधूनमधून शहरात विविध ठराविक भागात वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. न्यायालयाकडून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर हटकून वाहतूक कोंडी होत असते. रात्रीच्यावेळी तर बराचवेळ वाहतूक खोळंबून राहते. वाहतूक विभागाचे पोलिस अधूनमधून बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई करतात. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले, की बेशिस्त पार्किंगचे प्रकार घडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT