Parents angry on school management in Vasco Dainik Gomantak
गोवा

शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांची शिक्षकांवर नाराजी

शाळेच्या वेळेत काही घडल्यास शाळा व्यवस्थापन जबाबदार नसल्याची नोंद केल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को : वास्कोतील शाळा पुन्हा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी काही पालक शिक्षकांवर नाराज झाल्याचं चित्र आहे. शाळेच्या वेळेत काही घडल्यास शाळा व्यवस्थापन जबाबदार नाही, अशी नोंदवहीत सही करण्यास शिक्षक पालकांना भाग पाडत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. जर शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांची हमी घेऊ शकत नाही, तर आम्ही कोणत्या आधारावर आमच्या मुलांना शाळेत पाठवू असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. (Parents angry on school management in Vasco News Updates)

राज्यात कोरोना (Corona) निर्बंधामुळे बंद असलेले शैक्षणिक वर्ग आज सोमवारपासून सुरू झाले आहेत. संबंधीत निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आल्यानंतर परिपत्रक जारी करण्यात आले होते. पहिली ते बारावी पर्यंतचे प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ग सुरु करण्यात आले आहेत. राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तातडीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारने शिक्षण खात्याला सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण देणारे शाळा (School) महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. हा आदेश 15 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील असे सांगण्यात आले. त्यानंतर 15 फेब्रुवारीला नवा अध्यादेश निघणे अपेक्षित होते. मात्र, 17 फेब्रुवारी ही तारीख उजाडली तरी अद्याप शाळांबाबत निर्णय झालेला नव्हता. राज्यांनी आपापल्या राज्यातील कोविड स्थितीची अवलोकन करून यासंबंधीच्या निबंधांचे निर्णय घ्यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी केली होती.आरोग्य खात्याच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, की सध्या देशभरात कोरोनाची स्थिती सुधारत आणि कमी होताना दिसत आहे. त्यामुळे यासंबंधीची नियम आणि अटींचे निर्णय राज्य सरकारने घ्यावेत, असे सुचविले होते.

दरम्यान शैक्षणिक वर्ग आज सोमवारपासून सुरू झाले. त्यानुसार शाळा गजबजलेल्या दिसल्या. रस्त्यावरुन विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत जाताना दिसत होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. तसेच इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालक आपल्या पाल्यांना शाळेत सोडायला जात असतानाचे सर्वत्र चित्र होते.

मात्र वास्को (Vasco) येथील सेंट अँड्र्ज हायस्कूल मध्ये शाळेच्या वेळेत काही घडल्यास शाळा व्यवस्थापन जबाबदार नाही, अशी नोंदवहीत सही करण्यास शिक्षक पालकांना भाग पाडत असल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली.त्यांनी याविषयी व्यवस्थापनाला जाब विचारली असता तुमच्या मुलाला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता असे उत्तर पालकांना मिळाले असता पालकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी याविषयी शिक्षण भागअधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच शिक्षण संचालकांकडेही सदर तक्रार करण्यात आली आहे. जर शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांची हमी घेऊ शकत नाही तर आम्ही कोणत्या आधारावर आमच्या मुलांना शाळेत पाठवू असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. याविषयी शिक्षण संचालनालयाने लक्ष घालून सदर समस्या सोडवावी, अशी विनंती पालकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT