GPA Logo Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: पॅरा ऑलिंपिक संघटना अजूनही संलग्नतेच्या प्रतिक्षेत; क्रीडामंत्री गावडे

Goa Assembly Monsoon Session: ‘विशेष’ खेळाडूंच्या निवड प्रक्रियेपासून सरकार दूर; तरीही निवडीनंतर करणार साहाय्‍य

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा पॅरा ऑलिंपिक संघटना अजून क्रीडा खात्याशी संलग्न नाही. त्यांच्याशी बोलणी झाली असून काही कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी राज्य विधानसभेत दिली. संघटनेला संलग्नता नसली, तरी विशेष खेळाडूंना सरकार सर्वतोपरी मदत करत असून त्यांच्या प्रशिक्षणाची सोयही करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पॅरा (विशेष) खेळाडूंच्या स्पेशल ऑलिंपिकसाठी राज्यातील खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत राज्य सरकारला कोणतीही भूमिका नाही, मात्र निवड झालेल्या खेळाडूला आणि त्याच्यासोबत एका व्यक्तीला जाता यावे यासाठी सारी मदत सरकार करेल, अशी माहितीही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी राज्य विधानसभेत दिली.

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी याविषयीचा प्रश्न विचारला होता. विशेष खेळाडूंसाठी केवळ प्रशिक्षण शिबिर घेऊन चालणार नाही तर अन्य काही प्रयत्नांची गरज आहे हे सरकार लक्षात घेणार आहे का अशी विचारणा त्यांनी केली.

ते म्हणाले, ‘‘बर्लिन पॅरा (स्पेशल) ऑलिंपिकमध्ये भारताने २०२ पदके जिंकली त्यातील २३ पदके गोमंतकीय खेळाडूंनी जिंकली होती. विशेष खेळाडूंसाठी प्रशिक्षक नेमले पाहिजेत. त्यांच्यासाठी निधीची तरतूद केली पाहिजे. असे करण्यात आम्ही कमी पडत आहोत. विशेष मुलांचा उत्साह वाढवला तर पदकांची संख्या दुप्पट होण्यास वेळ लागणार नाही.’’

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर म्हणाले, ‘‘पॅरा (स्पेशल) ऑलिंपिक सुरू होण्यास चार महिने राहिले असतानाच राज्यपातळीवर खेळाडूंची निवड तरी झाली आहे का?

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘विशेष खेळाडूंनी तिकीट काढून निधी मागितल्यावर बोर्डिंग पास मागितला जातो तो खरे तर प्रवास करतानाच मिळतो. खेळाडूने बक्षिसे मिळवल्यानंतर त्यांना सरकारकडून दिली जाणारी बक्षिसाची रक्कम अजून मिळालेली नाही. खेळाडूंना किट घेण्यासाठी केवळ दोन हजार रुपये दिले जातात. त्यात केवळ जर्सी घेता येते. विशेष मुलांना स्पर्धेच्या ठिकाणी जाताना एक व्यक्ती सोबत न्यावी लागते त्यासाठी प्रवास खर्चाची तरतूद सरकार करणार आहे का?’’

क्रीडामंत्री म्हणाले, आणखी कोणत्या विशेष विद्यार्थ्याला खेळाबाबत विशेष प्रशिक्षण हवे असल्यास तशी विनंती केलेली नाही. नॅशनल पॅरा चॅम्पियनशिप, पॅरा ऑलिंपिक, नॅशनल पॅरा गेम्स आदी स्पर्धांत विशेष खेळाडूंना सहभागी होण्यासाठी सरकारने मदत केली आहे. त्यांच्या संघटनेला सरकारची मान्यता मिळाल्यावर अनुदानही दिले जाईल.

बक्षीस रक्कम गणेश चतुर्थीपूर्वी

राज्यातील क्रीडा पदक विजेत्यांना अजून राज्य सरकारतर्फे बक्षीस रक्कम देण्यात आलेली नाही. याविषयी क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले, की सर्व पदक विजेत्या खेळाडूंची बक्षिसाची रक्कम येत्या गणेश चतुर्थी पूर्वी दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT