viral video taxi driver flight  Dainik Gomantak
गोवा

राजधानीत टॅक्सी चालकांचा वाद; विमान पकडण्यासाठी निघालेल्या महिलेचा टाहो सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Taxi driver dispute panjim: मानतळावर जाणाऱ्या महिलेला टॅक्सी चालक आणि रेंट अ कॅब चालक यांच्यातील वादामुळे मनस्ताप सहन करवा लागला, सध्या यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर बराच चर्चेत आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून खासगी टॅक्सी चालक आणि रेंट अ कॅब यांच्यामध्ये काही कारणांवरून वाद सुरू असतात, आणि त्याचा फटका प्रवाशांना बसतो. राजधानी पणजी येथे सोमवार (दि. 5) रोजी असाच एक प्रसंग घडला. विमानतळावर जाणाऱ्या महिलेला टॅक्सी चालक आणि रेंट अ कॅब चालक यांच्यातील वादामुळे मनस्ताप सहन करवा लागला, सध्या यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर बराच चर्चेत आहे.

नेमका प्रकार काय?

बांबोळी क्रूसजवळील प्रमुख रस्त्यावरच हा प्रकार घडला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार दोन टॅक्सी चालकांमध्ये झालेल्या वादामुळे टॅक्सी चालक दुसऱ्या चालकाला पुढे जाऊ देत नव्हता, यामुळे टॅक्सीमध्ये असलेली आणि विमानतळाच्या दिशेने जाणारी महिला त्रस्त झाली, आणि रडू लागली.

महिला भांडण मिटवण्याची किंवा विमान चुकेल या भीतीने पुढे जाण्याची विनवणी करत होती मात्र दोन्ही टॅक्सी चालक तिचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.

टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनुसार, महिलेला घेऊन विमानतळावर चाललेल्या टॅक्सी चालकाने त्याच्या गाडीला धडक दिली. ही धडक जबर असल्याने त्याच्या टॅक्सीचे नुकसान झाले आहे आणि म्हणूनच ही नुकसान भरून देण्यासाठी त्याने गाडी अडवली होती.

दुसऱ्या बाजूला महिलेसह विमानतळावर जाणाऱ्या टॅक्सी चालकाने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल आणि दोघांमध्ये हमरातूमरी सुरू झाली. माहिला मात्र दोघांना विनवणी करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. ती पर्यटक महिला रडत असून देखील दोन्ही चालक तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत केवळ त्यांच्या भांडणामध्ये गुंतलेले व्हिडिओमध्ये पाहायला मिळतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: अर्थसंकल्‍प चिप्‍स पाकिटासारखा नव्‍हे, चतुर्थीच्‍या माटोळीसारखा! गोविंद गावडेंसह विरोधकांना CM सावंतांचा टोला

Goa Rain Update: गोवेकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

SCROLL FOR NEXT