Panjim City
Panjim City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City Scam : ‘स्मार्ट सिटीच्या नावाखाली 100 कोटींचा महाघोटाळा’

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City Scam : पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प आणि ‘अमृत मिशन’च्या नावाखाली 100 कोटी रुपयांचा घोटाळा करण्‍यात आल्‍याची तक्रार समाजकार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर यांनी राज्याच्या दक्षता खात्याकडे केली आहे. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदीप्ता पाल चौधरी यांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सदर अधिकाऱ्याची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती झाली होती. कंत्राटी मुदत संपली तरी तो अधिकारी आपली खुर्ची सोडायला तयार नाही. त्याने बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपये प्रकल्पाच्या बँक खात्यातून काढल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. कंत्राट संपूनही वेतन म्हणून 31 लाख 83 हजार रुपये त्यांना देण्यात आले आहेत. हे पैसे वसूल करण्यात यावेत अशी मागणी करून 39 कोटी 30 लाख रुपये बेकायदेशीररित्या विनाकारण काढण्यात आले आहेत, असा आरोप वेलिंगकर यांनी केला आहे.

या प्रकल्पाचे किती काम झाले व किती बाकी आहे, त्याचा तपशील तपासण्यात यावा व प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये कसे खर्च झाले याची दक्षता खात्याने सखोल चौकशी करावी अशी मागणी वेलिंगकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim: लाईट नाही म्हणून मध्यरात्री केला आमदाराला फोन; जीत आरोलकरांची थेट पोलिसांत तक्रार

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Goa Today's Live News: बोर्डा येथील मोडकळीस आलेल्या घरात सापडला मृतदेह

राजस्थानमधून गुजरातमध्ये करायचा विदेशी मद्य तस्करी; 50 हजारांचे बक्षीस असणारा डांगी अखेर गोव्यात जेरबंद

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT