Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: पणजीत ‘स्मार्ट’ खड्ड्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

स्मार्ट सिटी मिशनंतर्गत पणजीत सध्या रस्ते, मलनिस्सारण, सुशोभिकरणाची कामे सुरू असून ठिकठिकाणी रस्ते खोदल्याने लोक त्रस्त आहेत.

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: स्मार्ट सिटी मिशनंतर्गत पणजीत सध्या रस्ते, मलनिस्सारण, सुशोभिकरणाची कामे सुरू असून ठिकठिकाणी रस्ते खोदल्याने लोक त्रस्त आहेत. तर काँग्रेसने काल आंदोलनाद्वारे या कामात घोटाळ्याचा आरोप केला. त्यातच गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावरील खचलेल्या खड्ड्यात मालवाहू ट्रक फसला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने काल सायंकाळी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

राजधानीतील स्मार्ट सिटी मिशन कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयपीएससीडीएल, जीएसयूडीए, सामाजिक बांधकाम खाते (रस्ते आणि मलनिस्सारण) आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या सरकारी व स्वायत्त संस्थांनी पणजीतील 8.53 किलोमीटर युनिव्हर्सल वॉकवेजचा विकास, कॅफे भोसले स्क्वेअरचे पादचारीकरण, सांतिनेझ आणि रुआ दे ओरेममधील 4.35 कि. मी. स्मार्ट रस्त्यांचा विकासासह पणजी शहरासाठी सीवरेज नेटवर्कमध्ये सुधारणा यासह अनेक कामे हाती घेतली आहेत.

बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी परस्पर समन्वय राखण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कामे नेमून दिलेल्या कालमर्यादीत पूर्ण होतील आणि रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात कमीत कमी व्यत्यय येईल, याची खात्री करणे महत्त्वाचे असल्याचा निर्देश त्यांनी दिले.

स्मार्ट सिटीत हजार कोटींचा घोटाळा - काँग्रेस

‘स्मार्ट सिटी‘च्या कामांमध्ये सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाने उपस्थित केलल्या 50 प्रश्‍नांची उत्तरे इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) द्यावीत, अशी मागणी करीत काँग्रेसने काल कार्यालयासमोर निदर्शने केली.

याप्रसंगी एल्विस गोम्स, अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, ॲड. वरद म्हार्दोळकर, जॉन नझारेथ, साईश आरोसकर, विवेक डिसिल्वा, मुक्तमाला फोंडवेकर, चंदन मांद्रेकर, नौशाद चौधरी, महेश म्हांबरे, व्यास चोडणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पंधरवड्यात तीन अपघात

सांतिनेझ येथील खड्ड्यात चिरेवाहू ट्रक कलंडण्याची पहिला घटना 7 फेब्रुवारीला घडली होती. त्यानंतर 10 तारखेला टोंक-करंझाळे येथेही सांडपाणी चेंबरची उभारणीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सांडपाणी वाहू टँकर कलंडला होता.

त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री आझाद मैदानाजवळ जमिनीखालून मलनिस्सारणाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जमिनीखालून खोदकाम झाल्याने सिमेंट पाईप घेऊन आलेल्या ट्रकचा भार त्या रस्त्याला सोसावला नाही. त्यामुळे रस्ता खचून ट्रक खड्ड्यात रुतला.

आयपीएससीडीएलच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक त्रस्त आहेत. भाजप सरकार हळूहळू या कामांतून मोठी लूट करीत आहे. हा किमान एक हजार कोटींचा घोटाळा आहे. स्मार्ट सिटीच्या कामांतील घोटाळा उघड करण्यासाठी पावले उचलली जातील आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. - ॲड. वरद म्हार्दोळकर, काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:मंत्री माविनचे 'सांबा', 'कालिया' काय करतात हे त्यांना माहित नाही"

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

SCROLL FOR NEXT