Leopard
LeopardDainik Gomantak

Leopard: साळावली धरण भागात आला बिबट्या; वनखात्याचे कानावर हात..!

साळावली धरण भागात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे.
Published on

Leopard: बांबोळी परिसरातील तो बिबट्या आता दोनापावला भागात पोहोचला आहे. त्यामुळे या श्रीमंत वस्तीत लोकांच्या छातीत धडकी भरली आहे. तरीही राज्याचे वनखाते दखल घ्यायला तयार नाही. ‘आम्हाला या भागात बिबट्या येईल, असे वाटत नाही. गोवा विद्यापीठानजीक आम्ही छुपे कॅमेरे लावून ठेवले होते. परंतु त्यामध्ये जंगली श्‍वापद सापडले नाही’, अशी माहिती एका ज्येष्ठ वनअधिकाऱ्याने काल ‘गोमन्तक’ला दिली.

दीड महिन्यांपूर्वी बांबोळी येथील आकाशवाणीच्या गेस्टहाऊसनजीक एका झाडावर बिबट्या बसलेला लोकांनी पाहिला होता. त्यावेळी ती बातमी सर्वप्रथम ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झाली. या घटनेनंतर गोवा विद्यापीठाने सूचना जारी केली होती.

लोकांनी या भागात एकटे-दुकटे फिरू नये. या भागात बिबट्या फिरत असल्याचे लोकांनी पाहिले आहे, अशी सूचना गोवा विद्यापीठाने जारी केली होती. त्यानंतर विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गामध्ये भीती निर्माण झाली होती.

Leopard
Mahadayi Water Dispute: गोव्याचे जलस्रोत उद्ध्वस्त करण्याचा डाव; म्‍हादईच्या पाण्यासाठी 1 हजार कोटी रुपये

या पार्श्‍वभूमीवर गेल्या बुधवारी बांबोळी नजीकच्या ओशनपार्क या गृहनिर्माण वसाहतीजवळ बिबट्याचे दर्शन झाले. या वसाहतीला खेटून असलेल्या एका छोट्या हॉटेलच्या मागील बाजूला बिबट्या लोकांनी पाहिला. हॉटेलने फेकून दिलेले अन्न खाण्यासाठी तो तेथे आला असावा, असा कयास आहे.

त्यानंतर ओशनपार्कने आपल्या रहिवाशांसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे. परंतु वनअधिकाऱ्यांना विचारता त्यांनी असा प्रकार घडला असल्याची शक्यता फेटाळून लावली. आम्ही कॅमेरे लावून ठेवले आहेत, त्यात बिबट्या दिसलेला नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे.

बिबट्याने झोपलेल्या कुत्र्यावर झडप घालून नेण्याची घटना साळावली धरणाच्या सुरक्षा फाटकावर घडल्याने सुरक्षा रक्षकात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 3.45 च्या सुमारास घडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

बोटॅनिकल गार्डनच्या मुख्य फाटकावर दिवसरात्र मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षा रक्षक असतात. बिबटा हा गार्डनच्या दिशेने आपले सावज टिपण्यासाठी अलगदपणे कसा येतो ते दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे

Leopard
Mahadayi Water Dispute: गोव्याचे जलस्रोत उद्ध्वस्त करण्याचा डाव; म्‍हादईच्या पाण्यासाठी 1 हजार कोटी रुपये

पहाटेच्या वेळी अचानक कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने सुरक्षा रक्षक केबिनच्या बाहेर येऊन आवाज करू लागताच बिबट्याने उचलून नेलेल्या कुत्र्याला सोडून दिल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र, बिबट्या धरणाच्या दिशेने गेल्यामुळे रात्री पुन्हा सावज टिपण्यासाठी येण्याची भीती सुरक्षा रक्षकांत निर्माण झाली आहे.

बॉटनिकल गार्डन परिसरात रात्रीच्या वेळी गुरे येऊ नयेत, म्हणूनही गार्डन मधील कर्मचारी रात्री अपरात्री गुरांना हाकण्याचे काम करतात. अशा प्रसंगी दबून बसलेल्या बिबट्याचा हल्ला होण्याची भीती बोटॅनिकल गार्डनच्या कामगार वर्गात पसरली आहे.

साळावली धरण परिसर आणि बोटॅनिकल गार्डन परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून लोखंडी जाळी घालण्याची गरज असून रात्री एकटे-दुकटे कामगार पोटासाठी काम करतात, त्यांच्याही सुरक्षेची काळजी सरकारने घेणे गरजेचे असल्याचे मत कामगारांतून व्यक्त केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com