Panjim Santa Cruz - Siridao Road Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz - Siridao: डांबर कमी खड्डेच जास्त! सांताक्रुझ-शिरदोन रस्त्याची दुर्दशा; दुचाकीस्‍वारांच्‍या जीवाला धोका

Panaji News: रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे वारंवार वाहन खराब होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यात रस्ता अरुंद नसल्याने वाहन चालविणे देखील कठीण बनले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Santa Cruz - Siridao Bad Road

पणजी: सांताक्रुझ ते शिरदोन या मुख्य रस्त्यावर डांबर कमी तर खड्डेच अधिक दिसत आहेत. रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून केवळ वाहनचालकांनाच नव्हे तर पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे विशेषत: दुचाकीस्‍वारांच्‍या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या रस्त्याची एकंदरीत स्थिती पाहता त्‍याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होते.

रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे वारंवार वाहन खराब होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यात रस्ता अरुंद नसल्याने वाहन चालविणे देखील कठीण बनले आहे. सरकारने पूर्णपणे रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथे अपघातांच्‍या संख्येत वाढ होण्याची शक्यता लोकांकडून वर्तविली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पंचायतीने रस्त्यांची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी यासाठी स्थानिक रहिवाशांनी माध्यमांद्वारे आवाहन केले आहे. जेव्हा सरकारकडून अंतोदय तत्वावर लोकांची मदत करण्याचे भाष्य केले जाते तेव्हा प्रत्येकाला चांगली सुविधा सुनिश्चित करणे हे सरकारचे व विभागाचे काम असते.

...तर रस्‍त्‍यावर उतरणार : ग्रामस्‍थांचा इशारा

रस्त्यावरून वाहने हाकणे कठीण बनले आहे. पाऊस असल्याने आम्ही रस्ता दुरुस्त करण्याची मागणीही केली नाही. मात्र आता पाऊस संपल्याने सरकारला रस्त्याचे काम करण्यास कुठलीही अडचण येणार नाही. लोकांना होत असलेला त्रास पाहता सरकारने अजून वेळ न दवडता रस्‍ता दुरुस्‍त करावा अन्‍यथा आम्‍हाला रस्‍त्‍यावर उतरावे लागले असा इशारा ग्रामस्‍थ व वाहनचालकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT