Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी'त कामांचा धूमधडाका! '18 जून'सह तीन मार्गांचे काम लवकरच सुरु होणार

Panaji News: केंद्र सरकारने स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने आता उर्वरित कामे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड हाती घेणार आहे. त्‍याअंतर्गत १८ जून मार्ग, महात्मा गांधी मार्ग आणि आत्माराम बोरकर मार्गाचे काम हाती घेतले जाईल.
Road Survey
Road SurveyCanva
Published on
Updated on

Panaji Smart City 18 June Road Repair Survey

पणजी: ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत पणजी शहरातील रस्त्यांचे काम पावसामुळे थांबले होते. सांतिनेज, मध्य पणजीतील काही मार्ग तसेच दादा वैद्य मार्गाचे काम करण्यात आले आहे. आता शहरातील सर्वांत अधिक रहदारीचा असणाऱ्या १८ जून मार्गाचे काम हाती घेणार आहे. त्यासाठी या रस्त्याच्या चढ-उताराचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.

केंद्र सरकारने स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने आता उर्वरित कामे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) हाती घेणार आहे. त्‍याअंतर्गत १८ जून मार्ग, महात्मा गांधी मार्ग आणि आत्माराम बोरकर मार्गाचे काम हाती घेतले जाईल. हे तिन्ही मार्ग महत्त्वाचे असल्याने काही दिवसांत काम पूर्ण करून ते पुन्‍हा सुरू करण्‍यात येणार आहेत.

सध्या १८ जून मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. रस्त्यावरील चढ-उतार, गटार या सर्व बाबींची पातळी तपासली जात आहे. या मार्गाचे काम हाती घ्यावयाचे झाल्यास इतर तीन मार्गांवरून अंतर्गत वाहतूक वळविली जाण्याची शक्यता आहे. चर्च स्क्वेअरकडून पणजी बसस्थानकाकडे जाण्यासाठी दादा वैद्य मार्गावरून वाहतूक वळविली जाऊ शकते.

Road Survey
Panaji Smart City: ‘स्मार्ट सिटी’ घोटाळ्यांबाबत ‘पीएमओ’ गंभीर; नगरविकास सचिवांना दिल्या चौकशीच्या सूचना

मलनि:स्सारणवाहिनीचे काम पूर्ण

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत शहरात नव्याने मलनि:स्सारणवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय त्यासाठी लागणाऱ्या चेंबरची उभारणी करण्‍यात आली आहे. सांतिनेजमधील ताडमाड मंदिराजवळील काही भाग अद्याप राहिला असल्याने तेथे ही वाहिनी टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com