Construction company |Panjim Dainik Gomantak
गोवा

Goa Construction:...यामुळे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक कंपनीची कार्यालये रस्त्यावर!

Panjim: सामाजिक कार्यकर्त्याकडून तक्रार आल्यावर महापालिकेने आक्षेप घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

पाटो परिसरात सध्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका प्रख्यात कंपनीचे इमारत उभारणीचे काम सुरू आहे. त्या कंपनीची कार्यालये थेट रस्त्यावर थाटण्यात आल्याने त्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याविरोधात महापालिका आयुक्तांकडे आक्षेप नोंदविला आहे.

या तक्रारीची नोंद संबंधित कंपनीने घेतली असून, लवकरच ती कार्यालये हटविण्यात येतील असे सांगितले आहे.

बांधकाम व्यवसायात देशभर प्रख्यात असलेल्या एका कंपनीचा प्रकल्प उभा राहत आहे. त्यासाठी या ठिकाणी पायलिंगचे काम सुरू झालेले आहे.

कंपनीने आपली फिरती कार्यालये रस्त्यावरच उभी केल्याने त्याचा अडथळा वाहनांना होत असतो.

शिवाय कला व संस्कृती खात्याच्या समोरील रस्ता मलनिस्सारण वाहिनी टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीस बंद आहे.

त्यामुळे येथील माती शेजारील रस्त्यावर पडत असल्याने या परिसरात वाहनांमुळे धूळ पसरलेली असते. दुपारी या परिसरात जाणेही मुश्‍किल असते, अशा तक्रारी येथील कर्मचाऱ्यांनी केलेल्याआहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT