Rama Kankonkar Assault Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध; विरोधकांचे सरकारविरोधी आंदोलन, सोमवारी 'गोवा बंद'चे काँग्रेसचे आवाहन

Rama Kankonkar: करंझाळे येथे कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा पडसाद गोव्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणावर उमटत आहे.

Sameer Amunekar

पणजी: करंझाळे येथे कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उमटत आहे. या घटनेविरोधात विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधी वातावरण चांगलेच पेटले आहे.

शुक्रवारी पणजीतील चर्च स्क्वेअर परिसरात लोप युरी आलेमाओ, विजय सरदेसाई, आमदार वीरेश बोरकर, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि गोवा आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांच्यासह अनेक आंदोलक जमले.

त्यांनी घोषणाबाजी करत सरकारवर कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना तेथून रोखले.

या आंदोलनादरम्यान अमित पाटकर यांनी गोवा बंदचं आवाहान केलंय. "हा हल्ला केवळ एका कार्यकर्त्यावर नाही, तर गोव्याच्या लोकशाहीवरच हल्ला आहे. राज्यात गुंडगिरी बळावली आहे, सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या हल्ल्याविरोधात सर्व गोमंतकीयांनी एकत्र यावे," असे आवाहन त्यांनी केले. तसेच, सोमवारी गोवा बंदचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

हल्ल्यामागील सूत्रधार कोण?

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "सरकारमधील लोकांशी संबंधित व्यक्तींनीच हा हल्ला घडवून आणला आहे. गोव्यातील नागरिक खरोखर सुरक्षित आहेत का? या हल्ल्याची योजना कोणी आखली आणि यामागील खरा सूत्रधार कोण आहे हे शोधणे गरजेचं आहे. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. आम्ही या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करतो," अशा शब्दात आलेमाव यांनी सरकारवर टिका केलीय.

मोठ्या प्रमाणावर जमलेल्या निदर्शकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी भाजप मुख्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या काळात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला, परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT