Ronaldo in Goa: गोमंतकीयांना प्रतिक्षा 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ची! तिकिटांसाठी होतेय गर्दी; फुटबॉलप्रेमींत कमालीची उत्सुकता

Cristiano Ronaldo in Goa: ख्रिस्तियानो रोनाल्डो कर्णधार असलेल्या सौदी अरेबियातील अल नासर क्लबविरुद्धचा एफसी गोवाचा होम सामना २२ ऑक्टोबरला फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एएफसी चँपियन्स लीग दोन फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवाच्या मोहिमेची सुरवात इराकच्या अल झाव्रा क्लबविरुद्धच्या सामन्यातील पराभवाने झालेली असली, तरी राज्यातील फुटबॉलप्रेमींना आता प्रतीक्षा ख्रिस्तियानो रोनाल्डोची आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो कर्णधार असलेल्या सौदी अरेबियातील अल नासर क्लबविरुद्धचा एफसी गोवाचा होम सामना २२ ऑक्टोबरला फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू गोव्यात खेळणार का याबाबत अजून स्पष्टता नाही, मात्र राज्यातील फुटबॉलप्रेमींत कमालीची उत्सुकता आहे.

त्या सामन्यासाठी बॉक्स ऑफिस तिकीट विक्रीस गुरुवारपासून सुरवात झाली. सौदी अरेबियातील मातब्बर संघ असलेल्या अल नासर क्लबमध्ये रोनाल्डोसह जगभरातील नावाजलेले कितीतरी फुटबॉलपटू आहेत.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

यामध्ये रोनाल्डोसह लिव्हरपूल क्लबचा दिग्गज सादियो माने, पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय जुवाव फेलिक्स, स्पॅनिश इनिगो काल्देरॉन, क्रोएशियाचा मार्सेलो ब्रोझोविच, ब्राझीलियन गोलरक्षक बेंतो माथेस क्रेप्स्की, तसेच किंग्सली कोमन, अँजेलो गॅब्रिएल यांचा समावेश आहे.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

सामन्याची तिकिटे महागडी

एफसी गोवा विरुद्ध अल नासर क्लब यांच्यातील सामन्यासाठी तिकिटे महागडी असली, तरी तिकिटांसाठी राज्यातील फुटबॉलप्रेमी उत्सुक असल्याचे गुरुवारी दिसून आले. दोन दिवस खुली तिकीट विक्री झाल्यानंतर तिकिटे ऑनलाईन उपलब्ध होतील, अशी माहिती एफसी गोवातर्फे देण्यात आली. पश्चिम स्टँडसाठी ८५०० रुपये, पूर्व स्टँडमधील वरच्या भागासाठी ६५०० रुपये, तर पूर्व स्टँडमधील खालच्या भागासाठी ५००० रुपये, दक्षिण स्टँड व उत्तर स्टँडच्या वरच्या भागासाठी प्रत्येकी ३५०० रुपये, तसेच उत्तर आणि दक्षिण स्टँडच्या खालच्या भागासाठी प्रत्येकी २५०० रुपये असा तिकीट दर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com