Panjim  Dainik Gomantak
गोवा

पणजी शहराच्या हिरवाईने नटलेल्या सैंदर्याला सिमेंटच्या जंगलाचे गालबोट

रात्रीच्या वेळीची काजव्यांची वस्ती ठरते आकर्षण

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याची राजधानी म्हणून मिरवणारे पणजी शहर आपली ओळख गमावत आहे. हिरवाईने नटलेल्या या शहरातील हिरवाई कुठेतरी कमी होताताना दिसत आहे. ओरेम खाडीच्या काठावर असलेल्या जुन्या पट्टो ब्रिजपासून फूट ब्रिजपर्यंत पसरलेली हिरवीगार बाग, जैवविविधतेने भरलेली विविध प्रकारची झाडे अगदी आजही साद घालतात. मात्र, पणजी शहराच्या हिरवाईने नटलेल्या या सैंदर्याला सिमेंटच्या जंगलाचे गालबोट लागत आहे. (Panjim city is losing its natural charm due to new constructions)

Panjim
Panjim

दरम्यान, रात्रीच्या वेळी या ठीकाणी काजवे पाहायला मिळत आहेत, जे पणजी (Panjim) शहरात दुर्मिळ आहेत. मात्र, हे उद्यान उद्ध्वस्त झाले असून, पर्यटक मनोरंजन केंद्राच्या नावाखाली नवनवीन बांधकामे या ठिकाणी सुरू आहेत. रात्रीच्या वेळी पणजीमधली चकाकी असणारी ही बाग पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरू शकली असती.

पोर्तुगीज काळात मांडोवी नदीच्या (Mandovi River) पाण्याखाली असलेला हा हिरवागार प्रदेश आणि क्रीडा विभागाची सरकारी मालमत्ता म्हणून पणजीकरांनी एवढी वर्षे गृहीत धरलेली ही हिरवीगार जागा अचानक खासगी मालमत्ता कशी बनते, याचे आश्चर्य आहे. पणजीची भावी पिढी आता या सुंदर जागेला नक्कीच मुकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: 'त्या' स्विगी बॉयची कसून चौकशी सुरू, पोलिसांच्या हाती लागणार नवे धागेदोरे?

Goa Live News: २५ ऑक्टोबरच्या अखेरीस गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाला विशेष मदत करण्याचे आश्वासन

Goa Water Metro: 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यासाठी मंत्री फळदेसाई केरळ दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल यांची घेणार भेट

Mashel Panchayat: माशेलात उपसरपंच बदलाचा खेळ, की लोकशाहीची थट्टा? राजकीय नाट्य शिगेला; तीन तासांत अविश्‍वास ठराव

Goa Chaturthi Market: डिचोलीच्या बाजारात माटोळीच्या खरेदीसाठी झुंबड, राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण!

SCROLL FOR NEXT