Pandurang Madkaikar Dainik Gomantak
गोवा

Goa Corruption Case: मडकईकरांनी लाच दिली होती! त्वरित कारवाई करा, अन्यथा कोर्टात जाऊ; तक्रारदारांचा इशारा

Pandurang Madkaikar Complaint: माजी मंत्री मडकईकर यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपाबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

Sameer Panditrao

Pandurang Madkaikar bribery case allegations

पणजी: माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपाबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रार देणाऱ्यांमध्ये सांताक्रूझचे माजी सरपंच तथा पंच सदस्य इनासियो परेरा, काँग्रेसचे जॉन नझारेथ यांच्यासह इतर तक्रारदार उपस्थित होते. यापूर्वी काशिनाथ शेट्ये यांच्यासह इतर सातजणांनी एसीबीच्या पोलिस निरीक्षकांकडे याच प्रकरणी तक्रार दिली होती आणि कारवाईची मागणी केली होती.

परंतु आता तक्रार देऊन चार-पाच दिवस ओलांडले तरीही तक्रारीची दखल घेतली नसल्याने यापूर्वीच्या तक्रारीवर सह्या करणारे तक्रारदार परेरा आणि नझारेथ यांनी आज एसीबी अधीक्षकांना तक्रार दिली आहे.

या तक्रारीत मडकईकर यांनी आपले सरकारी काम करण्यासाठी एका मंत्र्याला आपल्याला १५ ते २० लाख रुपये द्यावे लागल्याचे म्हटले होते. मडकईकर यांनी जो उल्लेख केला आहे, त्यावरून त्यांनी लाच दिली आहे, हे स्पष्ट होते.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी. लाच देणे हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा असून, त्यानुसार तो नोंद करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या तक्रारीत करण्यात आलेल्या मागणीची प्रत आज अधिक्षकांकडे दिली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

SCROLL FOR NEXT