Accident Pandharpur to Goa Dainik Gomantak
गोवा

"माऊलीच्या कृपेने जीव वाचला", पंढरपूरहून गोव्यात परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात; नेमकं काय घडलं वाचा

Goa Warkari Bus Crash: पंढरपूर येथील आषाढी वारी करून गोव्यात परतणाऱ्या वारकऱ्यांना आजरा-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघाताचा सामना करावा लागला.

Akshata Chhatre

कोल्हापूर: पंढरपूर येथील आषाढी वारी करून गोव्यात परतणाऱ्या वारकऱ्यांना आजरा-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघाताचा सामना करावा लागला. बांद्याजवळ, दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात सोमवारी (दि.७) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला, ज्यात हातुर्ली-मये येथील चार वारकरी जखमी झाले. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश असून, त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताचे कारण आणि बचावकार्य

मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम नागवेकर, त्यांच्या पत्नी कांचन नागवेकर, रत्नमाला चोडणकर आणि त्यांची मुलगी हे वारकरी पायी वारी करून पंढरपूरहून परत येत होते. रविवारी सायंकाळी मोटारगाडीतून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. आजरा येथे पोहोचल्यावर गाडीचा पुढचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली.

अपघात घडल्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी वारकऱ्यांना तेथील स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर, कांचन नागवेकर आणि रत्नमाला चोडणकर यांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले.

विठू माऊलीच्या कृपेने बचावल्याची भावना

दोन्ही गंभीर जखमी महिलांवर गोमेकॉत उपचार केल्यानंतर, त्यांना रात्री त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या भीषण अपघातातून बचावल्यानंतर, वारकऱ्यांनी "पंढरीच्या श्री विठू माऊलीची कृपा म्हणूनच आम्ही या अपघातातून वाचलो," अशी भावना व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

Chimbel: 'प्रकल्प उभारा, पण संवेदनशील चिंबलमध्ये नको'! मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार, शिरोडकरांचे स्पष्टीकरण

Goa Job Fraud: 24 लाख घेतले आणि फसवले! चिखलीतील पतीपत्नीवर गुन्हा दाखल; जहाजावर नोकरी देण्याचे दिले होते आमिष

Nightclub In Goa: लोकांच्या तोंडाला पाने पुसली का? ‘सील’ केलेले क्लब सुरू असल्याची धक्कादायक माहिती; कारवाईच्या फार्समुळे संताप

Vijay Hazare Trophy: शुभमन गिल, तेंडुलकरचा फ्लॉप शो! गोव्याचा सलग 3 रा पराभव; पंजाबची पाचव्या विजयाची नोंद

SCROLL FOR NEXT